lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > SIP ची ताकद; फक्त 1427 रुपये गुंतवून बनू शकता करोडपती, जाणून घ्या गणित...

SIP ची ताकद; फक्त 1427 रुपये गुंतवून बनू शकता करोडपती, जाणून घ्या गणित...

Investment Tips: आजकाल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर चांगले रिटर्न्स मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 04:44 PM2024-04-11T16:44:35+5:302024-04-11T16:45:40+5:30

Investment Tips: आजकाल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर चांगले रिटर्न्स मिळतात.

Mutual Funds Investment Tips: Strengths of SIP; You can become a millionaire by investing just 1427 rupees, know the math | SIP ची ताकद; फक्त 1427 रुपये गुंतवून बनू शकता करोडपती, जाणून घ्या गणित...

SIP ची ताकद; फक्त 1427 रुपये गुंतवून बनू शकता करोडपती, जाणून घ्या गणित...

Investment Tips: आजकाल अनेकांना वाढत्या महागाईमुळे गुंतवणुकीसाठी पैसे बाजुला काढून ठेवणे शक्यत होत नाही. अनेकजण तक्रारी करतात की, त्यांच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे, ज्यामुळे गुंतवणूक करू शकत नाहीत. असेही बरेच लोक आहेत, ज्यांनी वयाची चाळीशी ओलांडली, पण काहीच गुंतवणूक करू शकले नाहीत. पण, आता तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. 

उशीरा गुंतवणूक सुरू करुनही तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता. तुमचे वय 25 वर्षे असो वा 45 वर्षे असो. एक असा मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही काही वर्षांत मोठा निधी उभारू शकता. तुम्ही अगदी थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करुन लखपती-करोडपती होऊ शकता. फक्त तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीत सातत्य ठेवणे आणि थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडातील SIP बद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे गुंतवणूक करुन तुम्ही मोठा परतावा मिळवू शकता. 

SIP मध्ये मोठी शक्ती

10 वर्षे गुंतवणूक- म्युच्युअल फंडातील SIP द्वारे तुम्ही करोडपती बनू शकता. तुम्हाला फक्त 10 वर्षात करोडपती व्हायचे असेल, तर SIP कॅल्क्युलेटरनुसार तुम्हाला दरमहा 36000 रुपये गुंतवावे लागतील. यावर तुम्हाला 15 टक्के व्याज मिळाल्यावर तुमच्याकडे 10 वर्षात 1,00,31,662 रुपये येतील.

15 वर्षे गुंतवणूक-15 वर्षात करोडपती होण्यासाठी तुम्हाला मासिक 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. यावर 15 टक्के परतावा मिळाल्यावर तुम्ही पंधरा वर्षात 1,01,52,946 रुपये मिळवू शकता. 

20 वर्षे गुंतवणूक-तुम्ही म्युच्युअल फंडात 20 वर्षांसाठी मासिक 6600 रुपये SIP करत असाल, तर 20 वर्षांनंतर तुम्ही 1 कोटी रुपये उभे करू शकता. 20 वर्षांमध्ये तुम्हाला एकूण 15,84,000 रुपये गुंतवावे लागतील, तर त्यावरील परतावा 84,21,303 रुपये असेल. 

30 वर्षे गुंतवणूक- तुम्ही कमी रकमेतदेखील करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला 30 वर्षे दरमहा फक्त 1427 रुपये गुंतवावे लागतील. 30 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला रु 1,00,03,014 मिळतील. 

गुंतवणूक करण्यापूर्वी काय करावे?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य फंड निवडणे. लहान गुंतवणूकदारांसाठी फंड निवडणे हे सर्वात कठीण काम आहे, कारण योग्य फंड निवडण्यासाठी खूप रिसर्च करावा लागता. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कारण म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.

(नोट: म्यूच्युअल फंडातील गुंतवणूकीवर बाजारातील परिस्थितीनुसार व्याज मिळते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Mutual Funds Investment Tips: Strengths of SIP; You can become a millionaire by investing just 1427 rupees, know the math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.