Lokmat Money >गुंतवणूक > MBA Chai Wala: चहा विकून खरेदी केली Mercedes ची लक्झरी कार, किंमत 1 कोटींपेक्षा जास्त...

MBA Chai Wala: चहा विकून खरेदी केली Mercedes ची लक्झरी कार, किंमत 1 कोटींपेक्षा जास्त...

MBA Chai Wala Car Collection: चहा विकण्याला अनेकजण छोटा व्यवसाय समजतात, पण यात सातत्य ठेवल्यास चांगली कमाई होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:14 PM2023-02-14T16:14:20+5:302023-02-14T16:15:02+5:30

MBA Chai Wala Car Collection: चहा विकण्याला अनेकजण छोटा व्यवसाय समजतात, पण यात सातत्य ठेवल्यास चांगली कमाई होऊ शकते.

MBA Chai Wala Buys Mercedes luxury car, worth more than 1 crore... | MBA Chai Wala: चहा विकून खरेदी केली Mercedes ची लक्झरी कार, किंमत 1 कोटींपेक्षा जास्त...

MBA Chai Wala: चहा विकून खरेदी केली Mercedes ची लक्झरी कार, किंमत 1 कोटींपेक्षा जास्त...

Prafull Billore Buys Mercedes Benz:व्यवसाय छोटा असो वा मोठा, तो आवडीने केला तर चांगला पैसाही कमवता येतो. देशात अनेकजण आजही चहा विकण्याला छोटे काम मानतात. पण, याच देशात अनेकजण चहा विकून लखपती-करोडपती झाले आहेत. असाच एक तरुण आहे प्रफुल्ल बिलोरे(Prafull Billore), ज्याने चहा विकून कोट्यवधीची कंपनी स्थापन केली.

प्रफुल बिलोरेचा 'MBA चायवाला' हा व्यवसाय आज देशभरात प्रसिद्ध झाला आहे. एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर प्रफुलने 2017 मध्ये आयआयएम अहमदाबादच्या बाहेर चहाच्या स्टॉलमधून सुरुवात केली. सध्या त्याची देशभरात 100 हून अधिक आउटलेट आहेत. तर, याच प्रफुल बिलोरेने चहा विकून स्वतःसाठी एक कोटी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी केली आहे. 

नुकतीच त्याने एक कोटी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी केली आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर कारची डिलिव्हरी घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 1.5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला. त्याने मर्सिडीज बेंझ जीएलई 300डी(Mercedes-Benz GLE 300d), ही कार खेरेदी केली आहे.

याशिवाय त्याने कारसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे. यासोबत त्याने लिहिले, "देवाचे आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा, सर्वांचे कष्ट आणि जगभरातील लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद. आज आम्ही नवीन मर्सिडीज GLE 300D घरी आणली. देव सर्वांना आशीर्वाद देवो." या Mercedes-Benz GLE 300d मध्ये 2.0-लिटर, चार-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 245 PS आणि 500 ​​Nm पीक टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कार 7.2 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 225 किमी प्रतितास आहे.

Web Title: MBA Chai Wala Buys Mercedes luxury car, worth more than 1 crore...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.