JP Power Share: स्मॉल-कॅप कंपनी जयप्रकाश पावर व्हेंचर्स (JP Power) च्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ नोंदवली गेली. इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान शेअर 9% वाढून 19.25 रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावरही पोहोचला. या अचानक उसळीमागे अदानी ग्रुपशी संबंधित मोठी घडामोड असल्याचे समोर आले आहे.
अदानी ग्रुप वेदांताला मागे टाकणार?
दिवाळखोर घोषित झालेल्या जयप्रकाश असोसिएट्स (JAL) ला खरेदी करण्यासाठी अदानी ग्रुप आणि वेदांता या दोन मोठ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. बाजारातील माहितीप्रमाणे, अदानी ग्रुपने वेदांताला मागे टाकू शकतो. याचा थेट परिणाम JP Power च्या शेअरवर दिसून आला आहे. JAL कडे JP Power मधील सुमारे 24% हिस्सेदारी आहे. त्यामुळे JAL अदानीच्या मालकीत गेल्यास JP Power च्या बिझनेसला मोठा फायदा होईल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.
वेदांताची सर्वाधिक बोली, पण...
सप्टेंबरमध्ये JAL साठी खरेदीदार शोधण्यासाठी झालेल्या लिलावात वेदांताने 17,000 कोटींची बोली लावली होती. तर, अदानी एंटरप्राइझेसने यापेक्षा कमी 12,500 कोटी रुपयांची ऑफर दिली. पण मोठा फरक ‘पेमेंट टर्म्स’मध्ये आहे. वेदांताने पैसे 5 वर्षांत देण्याचा प्रस्ताव दिला, तर अदानी ग्रुपने फक्त 2 वर्षांत पूर्ण पेमेंट करण्याची तयारी दाखवली आहे.
CoC म्हणजेच लेनदार समितीला अदानींची ऑफर अधिक आकर्षक वाटत आहे. त्यामुळे JAL चा सौदा अदानींच्या बाजुने जात असल्याचे संकेत दिसत आहेत. JAL चे बिझनेस पोर्टफोलिओ रिअल इस्टेटपासून सिमेंट, पॉवर, हॉटेल्स, रोड इन्फ्रास्ट्रक्चर अशा मोठ्या सेक्टर्सपर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे ही डील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जेपी इन्फ्राचे एमडी अटकेत
या घडामोडींमध्ये आणखी एक मोठी घटना म्हणजे JP Infratech Ltd. चे मॅनेजिंग डायरेक्टर मनोज गौर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. जयप्रकाश असोसिएट्सने मनोज गौर यांच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपयांचा फसवणूक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
