JioFinance Free Gold : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या ग्राहकांसाठी डिजिटल गोल्ड वर एक खास ऑफर सुरू केली आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर ग्राहकांना सोन्याची खरेदी, साठवणूक आणि रिडेम्प्शनची सुविधा मोबाइल ॲपद्वारे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देते. ही ऑफर २३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, या काळात डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विशेष बक्षिसे आणि बोनस मिळणार आहेत.
जिओ फायनान्सची धमाकेदार ऑफर
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आकर्षक बक्षिसे आणि अतिरिक्त सोने मिळवण्याची संधी मिळणार आहे. जे ग्राहक २,००० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे डिजिटल गोल्ड खरेदी करतील, त्यांना खरेदी केलेल्या सोन्यावर २% अतिरिक्त सोने त्यांच्या डिजिटल गोल्ड वॉलेटमध्ये ७२ तासांच्या आत जमा केले जाईल. २०,००० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थेट १० लाख रुपयांच्या बक्षीस ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या ड्रॉमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, सोन्याची नाणी, मिक्सर ग्राइंडर आणि गिफ्ट व्हाउचर यांसारख्या वस्तूंचा समावेश असेल.
विजेत्यांची घोषणा २७ ऑक्टोबर २०२५ रोजी ईमेल आणि एसएमएसद्वारे केली जाईल.
१० रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक
जिओ फायनान्स प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्डची खरेदी अवघ्या १० रुपयांपासून सुरू करता येते. या ऑफरचा उद्देश ग्राहकांना दिवाळीच्या गर्दीत ज्वेलरी स्टोअर्सवर न जाता, घरी बसून सुरक्षितपणे सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करणे हा आहे. JioFinance आणि MyJio ॲप्सद्वारे ग्राहक खरेदी, साठवणूक आणि रिडेम्प्शनची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करू शकतात.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही क्रेडिट, विमा, डिजिटल पेमेंट आणि मालमत्ता व्यवस्थापन यांसारख्या अनेक वित्तीय सेवा आधीच प्रदान करते. कंपनी ब्लॅकरॉक आणि एलियान्स सारख्या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारीत काम करत आहे.
या दिवाळीत सोन्यात डिजिटल गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही ऑफर दुहेरी फायदा देणारी ठरू शकते.