Post Office Saving Schemes: १ जानेवारी २०२५ पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर गुंतवणूकदारांना पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत राहणार आहे. पोस्ट ऑफिस देशवासियांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. आज आपण येथे पोस्ट ऑफिसची एक लोकप्रिय योजना MIS (मंथली इनकम स्कीम) बद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दरमहा व्याजाची रक्कम दिली जाते. या योजनेत गुंतवणूक करून दरमहा ५५५० रुपये व्याज कसं मिळवता येईल, हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
MIS योजनेवर मिळतोय ७.४ टक्के वार्षिक व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या एमआयएस (MIS) योजनेवर ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत किमान १००० रुपयांच्या गुंतवणुकीसह खातं उघडता येतं. एमआयएस योजनेअंतर्गत, सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. तर, जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. एमआयएस योजनेच्या जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. विशेष म्हणजे, या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते, म्हणजेच तुम्हाला यात एकरकमी पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर तुमच्या खात्यात ५ वर्षांपर्यंत दरमहा व्याजाचे पैसे येण्यास सुरुवात होते.
बँक ऑफ बडोदामधून ₹५० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी? EMI किती असेल, पाहा
५ वर्षांत मॅच्युअर होते स्कीम
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम ५ वर्षांत मॅच्युअर होते. मॅच्युरिटीवर तुम्ही गुंतवलेले सर्व पैसे परत मिळतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ९ लाख रुपयांची कमाल गुंतवणूक रक्कम जमा केली, तर तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दरमहा ५५५० रुपये निश्चित व्याज मिळू लागेल. व्याजाचे हे पैसे थेट तुमच्या बचत खात्यात जमा होतात.
पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचंच बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही बचत खातं नसेल, तर तुम्हाला आधी बचत खाते उघडावं लागेल, त्यानंतरच तुम्ही मंथली इनकम स्कीममध्ये खातं उघडू शकता, कारण व्याजाचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यातच ट्रान्सफर केले जातात.
