Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > 'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

India US trade deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:21 IST2025-06-30T16:19:10+5:302025-06-30T16:21:15+5:30

India US trade deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

India US trade deal: 'Terms will be implemented...', the central government's first reaction to the India-US trade agreement | 'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

India US trade deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतासोबत व्यापार करार होणार असल्याचे सांगितले होते. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. अर्थमंत्र्यांनी म्हटले की, भारताला अमेरिकेसोबत चांगला करार करायला नक्कीच आवडेल, परंतु त्यासाठी काही अटी असतील.

भारतासाठी व्यापार करार का महत्त्वाचा आहे?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अमेरिकेसोबतचा व्यापार करार भारतासाठी का महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. फायनान्शियल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण म्हणाल्या, 'हो. आम्हाला एक चांगला करार करायचा आहे. आपण ज्या टप्प्यावर आहोत, आपली उद्दिष्टे पाहता, मजबूत अर्थव्यवस्थांसोबत आपण जितक्या लवकर असे करार करू, तितके ते आपल्यासाठी चांगले असतील. पण, यासाठी काही अटीही ठेवल्या जातील.'

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची परिस्थिती ८ जुलैपर्यंत पूर्णपणे स्पष्ट होईल. ट्रम्प यांच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर केले जाऊ शकतात. या करारात आयटी, उत्पादन आणि सेवा तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश असू शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबतची संपूर्ण परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. लवकरच याबाबत अपडेट मिळू शकेल.

 

Web Title: India US trade deal: 'Terms will be implemented...', the central government's first reaction to the India-US trade agreement