Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये लोक पैसे गुंतवू शकतात आणि खूप मोठा फंड जमा करू शकतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडावं लागतं. आता पोस्ट ऑफिसने एक नवा नियम लागू केला आहे, ज्याअंतर्गत ३ वर्षांपासून निष्क्रिय असलेली पोस्ट ऑफिस खाती बंद होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुमचंही पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट असेल आणि तुमचं अकाऊंट ३ वर्षांपासून निष्क्रिय असेल तर तुमचं खातंही आता बंद होऊ शकतं. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
कोणती खाती बंद होणार?
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल आणि तुमचं खातं मॅच्युअर झालं असेल आणि मॅच्युरिटी असूनही तुम्ही ते खातं ३ वर्षे बंद केलं नाही किंवा वाढवलं नाही तर तुमचं खातं पोस्ट ऑफिसद्वारे बंद केलं जाईल. पोस्ट ऑफिसकडून १ वर्षात २ वेळा हे काम केले जाईल आणि खाती बंद केली जातील.
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
खाते गोठवलं तर काय होईल?
जर तुमचं पोस्ट ऑफिस खातं गोठवलं गेलं असेल तर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणतेही व्यवहार करू शकणार नाही आणि इतर सुविधांचा ही लाभ घेऊ शकणार नाही. याशिवाय व्याजाचा लाभ मिळणार नाही. एनएससी, एससीएसएस, केव्हीपी, एमआयएस, टीडी, आरडी अशा सर्व पोस्ट ऑफिस योजनांच्या खात्यांना हा नवा नियम लागू आहे.
अकाऊंट कसं अॅक्टिव्हेट कराल?
आपलं गोठवलेलं पोस्ट ऑफिस खातं सक्रिय करण्यासाठी आपल्याला आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल आणि येथे आपल्याला सर्व केवायसी कागदपत्रांसह फॉर्म एसबी -७ ए भरावा लागेल. तो पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.