Lokmat Money >गुंतवणूक > Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा

Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील नागरिकांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार विविध बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्रासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:01 IST2025-07-24T15:00:32+5:302025-07-24T15:01:54+5:30

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील नागरिकांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार विविध बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्रासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात.

How much interest will you get per month if you deposit Rs 2 lakh in Post Office s MIS scheme Check quickly | Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा

Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील नागरिकांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार विविध बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्रासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात. आज आपण येथे मंथली इनकम स्कीम अर्थात एमआयएस बद्दल जाणून घेणार आहोत. एमआयएस ही एक बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर तुम्हाला दरमहा व्याजाचे पैसे दिले जातात. येथे आपण एमआयएस योजनेत २ लाख रुपये जमा केल्यास दरमहा किती व्याज मिळेल हे जाणून घेऊ. यासोबतच या योजनेशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीही जाणून घेणार आहोत.

अनिल अंबानी पुन्हा एकदा संकटात, अनेक ठिकाणी EDचा छापा; शेअर आपटले, आता कंपनीचं स्पष्टीकरण

१००० रुपयांनीही खातं उघडू शकता

मंथली इनकम स्कीम अंतर्गत कमीत कमी १००० रुपयांमध्ये खातं उघडता येतं. या योजनेत एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात. जॉइंट अकाऊंट उघडल्यास त्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयेही जमा करता येतात. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ जणांची नावं जोडली जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत उघडलेलं खाते ५ वर्षांत मॅच्युअर होतं.

२ लाखांवर किती व्याज?

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खातं नसेल तर आधी तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खातं उघडावं लागेल, त्यानंतर तुम्ही मंथली इनकम स्कीममध्येही खातं उघडू शकता. जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला ५ वर्षांसाठी दरमहा १२३३ रुपये फिक्स्ड आणि गॅरंटीड व्याज मिळेल. ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा केलेले संपूर्ण २ लाख रुपये तुमच्या खात्यात परत केले जातील. यासोबतच तुम्हाला ५ वर्षात १२३३ रुपये दरानं एकूण ७३,९८० रुपयांचे व्याजही मिळणार आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: How much interest will you get per month if you deposit Rs 2 lakh in Post Office s MIS scheme Check quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.