Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!

मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!

Investment Options : सोने आणि एसआयपी हे दोन्ही लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहेत. परंतु, त्यांचे उद्दिष्ट आणि परतावा वेगवेगळा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:10 IST2025-11-20T16:30:57+5:302025-11-20T17:10:20+5:30

Investment Options : सोने आणि एसआयपी हे दोन्ही लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहेत. परंतु, त्यांचे उद्दिष्ट आणि परतावा वेगवेगळा आहे.

Gold vs SIP for Child's Future Analyzing Returns, Risk, and Liquidity for Long-Term Investment | मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!

मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!

Investment Options : आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक पालक अनेक गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. यापैकी सोने आणि एसआयपी हे दोन सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. पारंपरिकपणे पालक मुलांसाठी सोन्याचे दागिने खरेदी करत असत, पण आता सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डसारख्या आधुनिक पर्यायांकडे वळले आहेत. जर तुम्ही मुलांच्या दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टिकोनातून सोने आणि एसआयपी यांमध्ये गोंधळात असाल, तर या दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे
फायदे

सोन्यात गुंतवणूक केल्यास महागाईच्या काळात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होत नाही, कारण सोन्याचे दर महागाईसोबत वाढतात. जेव्हा शेअर बाजार खाली येतो, तेव्हा सोने सहसा स्थिर राहते किंवा वाढते, ज्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ संतुलित राहतो आणि जोखीम कमी होते. सोने कधीही आणि कुठेही सहज विकता किंवा खरेदी करता येते. तसेच, सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला २.५% अतिरिक्त व्याज देखील मिळते.

तोटे
दागिने म्हणून सोने घेतल्यास मेकिंग चार्ज आणि जीएसटीमुळे त्याची किंमत वाढते. एसआयपीच्या तुलनेत सोने दीर्घकाळात कमी परतावा देते. किंमत वाढल्यावरच फायदा होतो. भौतिक सोन्याच्या बाबतीत ते सुरक्षित ठेवण्याची चिंता नेहमी असते.

एसआयपी मधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे
फायदे

इक्विटी एसआयपीने दीर्घकाळात १२ ते १५% पर्यंत सरासरी परतावा दिला आहे. अनेक फंड्सने याहूनही अधिक रिटर्न दिले आहेत. जर तुम्ही १० ते १५ वर्षांसाठी सातत्याने एसआयपी चालू ठेवली, तर चक्रवाढीच्या शक्तीमुळे तुमची गुंतवणूक अनेक पटींनी वाढू शकते. तुम्ही अगदी कमी रकमेपासून (उदा. ₹५००) एसआयपी सुरू करू शकता. बाजार खाली आल्यावरही एसआयपी फायदेशीर ठरते, कारण त्यावेळी तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात, जे बाजारात तेजी आल्यावर चांगला परतावा देतात.

तोटे आणि आव्हाने
एसआयपी इक्विटी बाजाराशी जोडलेली असल्यामुळे बाजारातील चढ-उतारांमुळे शॉर्ट टर्ममध्ये नुकसान दिसू शकते. जर तुम्ही एसआयपी मध्येच थांबवली, तर चक्रवाढ वाढीचा पूर्ण फायदा मिळत नाही. त्यामुळे एसआयपीमध्ये दीर्घ कालावधी आणि नियमितता अत्यंत महत्त्वाची आहे.

योग्य निर्णय कसा घ्यावा?

  1. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सोने आणि एसआयपी या दोन्हींचे स्वतःचे महत्त्व आहे.
  2. पोर्टफोलिओला स्थिरता आणि सुरक्षा देण्यासाठी तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीचा काही भाग (उदा. १०-१५%) सॉवरेन गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवू शकता.
  3. तर दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी, तुमच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा (उदा. ७०-८०%) चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये नियमितपणे गुंतवावा.

वाचा - रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का

थोडक्यात, सोन्याचा उपयोग सुरक्षेसाठी करा आणि एसआयपीचा उपयोग भरघोस परतावा मिळवून मुलांचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी करा.
 

Web Title : बच्चों के भविष्य के लिए सोना या SIP? फायदे-नुकसान समझें!

Web Summary : बच्चों का भविष्य सुरक्षित करें: सोने और एसआईपी निवेशों का मूल्यांकन करें। सोना स्थिरता प्रदान करता है, जबकि एसआईपी दीर्घकालिक में उच्च रिटर्न का वादा करता है। बुद्धिमानी से विविधता लाएं।

Web Title : Gold or SIP for Child's Future? Understand Pros & Cons!

Web Summary : Secure your child's future: Weigh gold vs. SIP investments. Gold offers stability, while SIPs promise higher returns long-term. Diversify wisely.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.