Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी; चांदी ५,३०० पेक्षा अधिकनं महागली, Gold चा नवा दर काय?

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी; चांदी ५,३०० पेक्षा अधिकनं महागली, Gold चा नवा दर काय?

Gold Silver Rate Today in Maharashtra: पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बुलियनमध्ये खरेदी वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:33 IST2026-03-27T11:33:33+5:302026-03-27T11:33:33+5:30

Gold Silver Rate Today in Maharashtra: पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बुलियनमध्ये खरेदी वाढवली आहे.

Gold Silver Rate Today 27 march 2026 Big rise in gold and silver prices Silver has become more expensive by more than 5300 what is the new price of Gold | Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी; चांदी ५,३०० पेक्षा अधिकनं महागली, Gold चा नवा दर काय?

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी तेजी; चांदी ५,३०० पेक्षा अधिकनं महागली, Gold चा नवा दर काय?

Gold Silver Rate Today: सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये शुक्रवारी वाढ पाहायला मिळाली. पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बुलियनमध्ये (सोने-चांदी) खरेदी वाढवली आहे. चांदीची किंमत ५,३८० रुपयांनी वधारून २.२५ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली. तर सोन्याचा भाव १,३२० रुपयांनी वाढून १.४१ लाख रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

जागतिक बाजारपेठेतील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतींमधील घसरण थांबल्याचं चित्र दिसलं आणि दोन्ही धातूंच्या दरात हलकी वाढ नोंदवली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या कराराची मुदत पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं बाजारपेठेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कॉमेक्सवर (Comex) सोन्याचा दर ०.३३% वाढून ४,४२३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला, तर चांदीची किंमत ०.२९% वाढून ६८.१३ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून Fastag मध्ये होणार मोठा बदल, खिशावर पडणार भार

घसरण का थांबली?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची कारवाई सध्या १० दिवसांसाठी पुढे ढकलल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट होती, जी या निर्णयामुळे काही प्रमाणात कमी झाली आहे.

अजूनही किमतींवर दबाव असण्याची कारणे

उच्च व्याजदराची भीती: ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा धोका वाढला आहे. यामुळे मध्यवर्ती बँका व्याजदर चढे ठेवू शकतात, परिणामी विना-व्याज मालमत्ता असलेल्या सोन्या-चांदीची मागणी कमी होते.

मजबूत डॉलर: डॉलर इंडेक्स १०० च्या स्तरावर असून संघर्ष सुरू झाल्यापासून त्यात सुमारे २.३% वाढ झाली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे कमोडिटी महाग होतात आणि मागणी कमकुवत पडते.

तुर्कीकडून सोन्याची विक्री: 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने संघर्षाच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यांत सुमारे ६० टन सोनं विकलं किंवा स्वॅप केलं, ज्यामुळे बाजारावर अतिरिक्त दबाव आला.

एका महिन्यात मोठा फटका

पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे १७% घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात सोन्यानं आपल्या पारंपारिक 'सेफ हेवन' गुणधर्माप्रमाणे वागण्याऐवजी शेअर बाजाराच्या कलानुसार वाटचाल केली आणि ते तेलाच्या किमतींच्या विरुद्ध दिशेनं राहिलं.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में तेजी, वैश्विक अनिश्चितता का असर

Web Summary : मध्य पूर्व तनाव के कारण सोने और चांदी की कीमतों में तेजी आई। चांदी ₹5,380 बढ़कर ₹2.25 लाख प्रति किलो हो गई, जबकि सोना ₹1,320 बढ़कर ₹1.41 लाख प्रति 10 ग्राम हो गया। अमेरिका द्वारा ईरान समझौते पर वार्ता बढ़ाने के बाद वैश्विक बाजारों में मामूली लाभ हुआ, लेकिन उच्च ब्याज दरें और एक मजबूत डॉलर अभी भी कीमतों पर दबाव डाल सकते हैं।

Web Title : Gold and Silver Prices Surge Amidst Global Uncertainty Today

Web Summary : Gold and silver prices rose sharply due to Middle East tensions. Silver jumped ₹5,380 to ₹2.25 lakh per kg, while gold increased ₹1,320 to ₹1.41 lakh per 10 grams. Global markets saw slight gains after the US extended Iran deal talks, but high interest rates and a strong dollar could still pressure prices.