Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > एका झटक्यात सोनं ₹७७९५ नं महागलं, चांदीतही ₹१०,७३० ची तेजी; का वाढतेय इतकी किंमत?

एका झटक्यात सोनं ₹७७९५ नं महागलं, चांदीतही ₹१०,७३० ची तेजी; का वाढतेय इतकी किंमत?

Gold Silver Price 21 Jan 2026: सोने आणि चांदीच्या दरातील विक्रमी वाढ सुरूच असून दोन्ही धातूंनी आज पुन्हा नवा इतिहास रचला आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:33 IST2026-01-21T13:32:46+5:302026-01-21T13:33:30+5:30

Gold Silver Price 21 Jan 2026: सोने आणि चांदीच्या दरातील विक्रमी वाढ सुरूच असून दोन्ही धातूंनी आज पुन्हा नवा इतिहास रचला आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Rate Today 21 jan 2026 Gold rose by rs 7795 in an instant silver also rose by rs 10730 Why is the price increasing so much | एका झटक्यात सोनं ₹७७९५ नं महागलं, चांदीतही ₹१०,७३० ची तेजी; का वाढतेय इतकी किंमत?

एका झटक्यात सोनं ₹७७९५ नं महागलं, चांदीतही ₹१०,७३० ची तेजी; का वाढतेय इतकी किंमत?

Gold Silver Price 21 Jan 2026: सोने आणि चांदीच्या दरातील विक्रमी वाढ सुरूच असून दोन्ही धातूंनी आज पुन्हा नवा इतिहास रचला आहे. मंगळवारच्या बंद दराच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात ७,७९५ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी १०,७३० रुपयांनी महागली आहे. जीएसटीसह (GST) चांदीचा भाव आता प्रति किलो ३.३० लाख रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. तसंच, २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,५९,८६० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून तो आता सुमारे १.६० लाखांच्या घरात आहे.

२१ दिवसांतील मोठी दरवाढ 

या वर्षाच्या केवळ २१ दिवसांत चांदी ८९,७५५ रुपयांनी महागली आहे, तर सोन्याच्या भावात २२,००९ रुपयांची वाढ झाली. आज जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो ३,२०,०७५ रुपयांवर पोहोचला. सोन्याचे दर आज जीएसटीशिवाय १५५,२०४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. मंगळवारी जीएसटीशिवाय चांदी ३,०९,३४५ रुपयांवर आणि सोनं १,४७,४०९ रुपयांवर बंद झाले होते. 'आयबीजेए' (IBJA) दिवसातून दोनदा हे दर जाहीर केले जातात.

ग्रीनलँड वादादरम्यान रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आता किती झाला भाव?

कॅरेटनुसार सोन्याचे दर

१४ कॅरेट: ४,५६० रुपयांच्या वाढीसह जीएसटीसह ९३,५१७ रुपयांवर आहे.
१८ कॅरेट: ५,८४६ रुपयांच्या उसळीसह जीएसटीसह १,१९,८९५ रुपयांवर पोहोचले.
२२ कॅरेट: ७,१४० रुपयांनी महाग होऊन जीएसटीसह १,४६,४३२ रुपयांवर पोहोचलेत.
२३ कॅरेट: ७,७६४ रुपयांच्या वाढीसह जीएसटीसह १,५९,२२० रुपयांवर उघडले आहे (यात मेकिंग चार्जचा समावेश नाही).

दरवाढीची प्रमुख कारणं कोणती? 

ट्रम्प यांचं ग्रीनलँड धोरण, युरोपीय देशांना दिलेली टॅरिफची धमकी आणि त्यावर युरोपची तीव्र प्रतिक्रिया यामुळे जागतिक व्यापार आणि विकासदराबाबत चिंता वाढली आहे. या अनिश्चिततेच्या काळात किरकोळ गुंतवणूकदारसोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळत आहेत. व्यापारी आणि आयातदारांच्या विक्रीमुळे अमेरिकन डॉलर कमकुवत झाला असून, त्याचा फायदा सोन्याचे दर वाढण्यास झाला आहे.

Web Title : सोना ₹7795 और चांदी ₹10,730 महंगी: मूल्य वृद्धि का कारण

Web Summary : सोने और चांदी की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर, क्रमशः ₹7795 और ₹10,730 की वृद्धि। सोना ₹1,59,860 प्रति 10 ग्राम पर, जबकि चांदी ₹3.30 लाख प्रति किलो के करीब। वैश्विक अनिश्चितता और कमजोर डॉलर निवेशकों को सोने और चांदी जैसी सुरक्षित संपत्तियों की ओर ले जा रहे हैं।

Web Title : Gold Soars ₹7795, Silver Jumps ₹10,730: Price Hike Explained

Web Summary : Gold and silver prices hit record highs, soaring by ₹7795 and ₹10,730 respectively. Gold reached ₹1,59,860 per 10 grams, while silver neared ₹3.30 lakh per kilo. Global uncertainties and a weaker dollar are driving investors towards safe assets like gold and silver.