Gold Silver Price Today On MCX: बुधवारी सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली वाढ आज ओसरल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात या मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली. एमसीएक्स (MCX) वर चांदीच्या किमतीत २,५०० रुपयांची घसरण झाली, तर सोनं १,००० रुपयांनी स्वस्त झालंय.
५ मार्च रोजी डिलिव्हरी असणारी चांदी गेल्या सत्रात २,६३,०१८ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, जी आज २,६१,३६१ रुपयांवर उघडली. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीनं २,६१,९२४ रुपयांचा उच्चांक आणि २,६०,१२८ रुपयांची नीचांकी पातळी गाठली. सकाळी ९:३० वाजेपर्यंत चांदी २,६४९ रुपयांच्या म्हणजेच १.०१ टक्के घसरणीसह २,६०,३६९ रुपयांवर व्यवहार करत होती.
सोनं, चांदी की शेअर्स... ₹३०,००० कुठे गुंतवायचे? राधिका गुप्ता यांनी दिल्या ५ जबरदस्त टीप्स
सोन्याच्या किमतीतील घसरणीचा तपशील
चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतीतही सुरुवातीच्या सत्रात घट नोंदवण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी डिलिव्हरी असणारं सोनं गेल्या सत्रात १,५८,७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं, जे आज १,५८,००० रुपयांवर उघडलं. सुरुवातीच्या सत्रात सोन्याचा दर १,५८,१७३ रुपयांपर्यंत वर गेला होता, तर १,५७,७०१ रुपयांपर्यंत खाली आला होता. सकाळी ९:३६ वाजेपर्यंत सोनं ८९७ रुपयांच्या म्हणजेच ०.५७ टक्के घसरणीसह १,५७,८५८ रुपयांवर ट्रेड करत होतं.
सोन्याचा भविष्यातील कल आणि अंदाज
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सच्या अहवालातील निष्कर्षांनुसार, सोन्याच्या किमती अल्प कालावधीसाठी एका मर्यादित कक्षेत राहू शकतात, परंतु मध्यम आणि दीर्घ कालावधीत त्यात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. जागतिक तणाव कमी झाल्यामुळे सध्या सोन्याची गती मंदावली असली तरी, केंद्रीय बँकांची सततची खरेदी आणि ईटीएफमधील जोरदार गुंतवणूक यामुळे सोन्याला बळकटी मिळत राहील. सध्याचा नफावसुलीचा काळ संपल्यानंतर बाजार पुन्हा एकदा या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करेल आणि सोन्याची भूमिका अधिक भक्कम होईल, असा विश्वास विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
