Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोनं, चांदी की शेअर्स... ₹३०,००० कुठे गुंतवायचे? राधिका गुप्ता यांनी दिल्या ५ जबरदस्त टीप्स

सोनं, चांदी की शेअर्स... ₹३०,००० कुठे गुंतवायचे? राधिका गुप्ता यांनी दिल्या ५ जबरदस्त टीप्स

Gold Silver And Shares Where to Invest: सोनं, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मात्र, अलीकडेच सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनं गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:26 IST2026-02-12T10:19:18+5:302026-02-12T10:26:13+5:30

Gold Silver And Shares Where to Invest: सोनं, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मात्र, अलीकडेच सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनं गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली आहे.

Gold silver or shares Where to invest rs 30000 Radhika Gupta gives 5 great tips | सोनं, चांदी की शेअर्स... ₹३०,००० कुठे गुंतवायचे? राधिका गुप्ता यांनी दिल्या ५ जबरदस्त टीप्स

सोनं, चांदी की शेअर्स... ₹३०,००० कुठे गुंतवायचे? राधिका गुप्ता यांनी दिल्या ५ जबरदस्त टीप्स

Gold Silver And Shares Where to Invest: सोनं, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मात्र, अलीकडेच सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनं गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली आहे. दुसरीकडे, शेअर बाजारातही मोठी खळबळ माजलेली आहे. अशा कमी परताव्याच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात नेमका कोणता फंड खरेदी करावा, हे अनेक गुंतवणूकदारांना समजत नाहीये. 

एडलवाईस म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी सांगितलं की, अलीकडच्या काळात अशा प्रश्नांचा ओघ वाढला आहे. लोक वारंवार विचारत आहेत की, त्यांच्याकडे असलेल्या ठराविक रकमेतून चांदी खरेदी करावी का किंवा कोणता फंड निवडावा. या पार्श्वभूमीवर राधिका गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर गुंतवणूकदारांसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.

"जर कामात आनंद मिळत नसेल तर वॉलेटरी एक्झिट प्लॅन निवडू शकता," का म्हटलं Google नं कर्मचाऱ्यांना असं? 

सर्वत्र संभ्रमाचं वातावरण आणि पोर्टफोलिओची स्थिती

राधिका गुप्ता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून मित्र, कुटुंबीय आणि सामान्य लोक त्यांच्या पोर्टफोलिओबद्दल सल्ला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क साधत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे विविध मालमत्ता वर्गांमधील (Asset Classes) कमालीची चढ-उतार हे आहे. गेल्या वर्षात काही ठिकाणी परतावा कमी किंवा नकारात्मक राहिला आहे, ज्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. राधिका गुप्ता यांच्या मते, कोणीही तुमच्या पोर्टफोलिओसाठी झटपट उपाय देऊ शकत नाही; कारण गुंतवणुकीच्या सल्ल्यासाठी वेळ आणि संदर्भ या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

गुंतवणुकीचं मूलभूत ज्ञान आणि वैयक्तिक विधानं

गुंतवणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मूलभूत गोष्टी शिकण्यावर भर दिला आहे. अनेक लोक आर्थिक ज्ञानाशिवाय थेट फंड खरेदी करू इच्छितात, जे श्वास घ्यायला न शिकता खोल पाण्यात उडी मारण्यासारखं आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी स्वतःचं वैयक्तिक गुंतवणूक विधान (Investment Statement) तयार करण्याचा सल्ला दिलाय. यामध्ये तुमची कमाई आणि खर्च, सध्याची गुंतवणूक आणि देणी, तुमची ध्येये व त्यांची कालमर्यादा आणि नुकसान सहन करण्याची तुमची क्षमता या चार गोष्टींचा स्पष्ट उल्लेख असावा.

व्यावसायिक मदत आणि संयमाची गरज

तिसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी व्यावसायिक व्यक्तीची मदत घेण्याचं सुचवलं आहे. मग तो म्युच्युअल फंड वितरक (MFD) असो किंवा गुंतवणूक सल्लागार, त्यांच्याशी चर्चा करताना तुम्ही तयार केलेले दस्तऐवज सोबत ठेवावेत. ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास बसेल अशा तज्ज्ञाची निवड करा. 

घाई करणं टाळा

चौथ्या मुद्द्यात त्यांनी घाई टाळण्याचा सल्ला दिला आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला त्या गुंतवणुकीबद्दल पूर्ण खात्री पटत नाही, तोपर्यंत थेट स्टॉक पोर्टफोलिओ किंवा चांदी खरेदी करण्याची घाई करण्याची गरज नाही.

चुकांमधून शिक्षण आणि बाजारातील घसरण

पाचव्या आणि शेवटच्या टिप्समध्ये राधिका गुप्ता यांनी चुकांबद्दल भाष्य केले आहे. जर तुम्ही अद्याप गुंतवणूक सुरू केली नसेल तर ती सुरू करा आणि जर सुरू केली असेल व त्यात चुका झाल्या असतील, तर घाबरून जाऊ नका. अगदी २००८ चे आर्थिक संकटही समजूतदार लोकांच्या चुकांमुळेच आले होते. त्यामुळे शांत राहा, विचार करा आणि चुकांतून शिकून पुढे जा. 

त्यांनी बाजारातील घसरणीची तुलना बोर्डाच्या परीक्षांशी केली आहे. त्यांच्या मते, मार्केट करेक्शन हे वेदनादायक असले तरी ते एक उत्तम शिक्षक आहे. प्रत्येक घसरण गुंतवणूकदाराला शिस्त, संयम आणि नवीन दृष्टीकोन शिकवते. 

Web Title : सोना, चांदी या शेयर: ₹30,000 निवेश के लिए राधिका गुप्ता के टिप्स

Web Summary : बाजार की अस्थिरता के बीच निवेश को लेकर भ्रमित हैं? राधिका गुप्ता बुनियादी बातों को सीखने, लक्ष्य निर्धारित करने, विशेषज्ञ सलाह लेने, जल्दबाजी से बचने और गलतियों से सीखने का सुझाव देती हैं। बाजार सुधार मूल्यवान सबक प्रदान करते हैं।

Web Title : Gold, silver, or shares: Radhika Gupta's tips for ₹30,000 investment.

Web Summary : Confused about investing amid market volatility? Radhika Gupta suggests learning basics, defining goals, seeking expert advice, avoiding haste, and learning from mistakes. Market corrections offer valuable lessons.