Gold Silver Rates : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि महागाईच्या काळातही सोन्याने आपली विश्वासार्हता कायम राखली आहे. बाजारपेठेत कितीही चढ-उतार आले तरी, मूल्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूकदार आजही सोन्यालाच सर्वोच्च पसंती देत आहेत. विशेष म्हणजे, आज १८ जानेवारी २०२६ रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर स्थिर असून गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सोन्याच्या किमती कशावर ठरतात?
भारतातील सोन्याचे दर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि देशांतर्गत दागिन्यांची मागणी (विशेषतः सणासुदीच्या काळात) यावर अवलंबून असतात. यामुळेच वेगवेगळ्या शहरांत दरांमध्ये थोडी तफावत दिसून येते.
- आजचे सोन्याचे दर (प्रति १ ग्राम)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): १४,३७८ रुपये
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने) : १३,१८० रुपये
- १८ कॅरेट : १०,७८४ रुपये
गेल्या काही दिवसांतील किरकोळ चढ-उतारानंतर, २४ कॅरेट सोन्याचा दर आज कालच्या इतकाच म्हणजेच १४,३७८ रुपये प्रति ग्रामवर स्थिरावला आहे.
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रामसाठी)
| शहर | २४K भाव (₹) | २२K भाव (₹) | १८K भाव (₹) |
| मुंबई/पुणे | १,४३,७८० | १,३१,८०० | १,०७,८४० |
| नागपूर/कोल्हापूर | १,४३,७८० | १,३१,८०० | १,०७,८४० |
| दिल्ली | १,४३,९३० | १,३१,९५० | १,०७,९९० |
| चेन्नई | १,४४,८७० | १,३२,८०० | १,१०,९०० |
| अहमदाबाद | १,४३,८३० | १,३१,८५० | १,०७,८९० |
टीप: वरील दर हे १० ग्रॅमच्या हिशोबात दिले आहेत.)
वाचा - 'फ्री' यूपीआयचा काळ संपणार? अर्थसंकल्प २०२६ मध्ये मोठ्या निर्णयाची शक्यता!
चांदीचे दर काय आहेत?
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. चांदीचा औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिच्या किमती जागतिक मागणीवर अवलंबून असतात. आज प्रति किलो चांदीचा दर २,९५,००० रुपये आहे. गुंतवणूकदारांसाठी चांदी हा आजही एक लोकप्रिय आणि परवडणारा पर्याय ठरत आहे.
