Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

Yellow Metal Prices: सणासुदीच्या आधी लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असल्याने सोन्याच्या किमतीत ही वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:00 IST2025-09-02T11:59:56+5:302025-09-02T12:00:38+5:30

Yellow Metal Prices: सणासुदीच्या आधी लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असल्याने सोन्याच्या किमतीत ही वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

Gold Rate Today Gold Price Hits Record High of ₹1.06 Lakh in India | सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता आणि नवीन जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव पुन्हा वाढले. 'गुड रिटर्न्स'च्या माहितीनुसार, केवळ ऑगस्टच्या शेवटच्या १० दिवसांतच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम सुमारे ३,००० रुपयांची वाढ झाली आहे.

या दरवाढीमागे दोन प्रमुख कारणे दिली जात आहेत. एक म्हणजे, सणासुदीच्या हंगामापूर्वी (दसरा, दिवाळी) सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर लवकरच ऐतिहासिक पातळी गाठू शकतात. दुसरे कारण म्हणजे, आर्थिक अनिश्चितता आणि राजकीय तणावामुळे (ट्रम्प टॅरिफ) गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देत आहेत.

आजचे सोन्याचे भाव (२ सप्टेंबर २०२५)
आज, २ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०६,०९० असून, त्यात २१० रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच, २२ कॅरेट सोन्याच्या दरात २०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांची वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोने (गुंतवणुकीसाठी): १,०६,०९० रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट सोने (दागिन्यांसाठी): ९७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट सोने: ७९,५३० रुपये प्रति १० ग्रॅम

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

  • दिल्ली: २४ कॅरेट - १,०६,२४० रुपये, २२ कॅरेट - ९७,४०० रुपये
  • मुंबई: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये
  • पुणे: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये
  • चेन्नई: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये
  • कोलकाता: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये
  • बंगळूरु: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये
  • हैदराबाद: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये
  • केरळ: २४ कॅरेट - १,०६,०९० रुपये, २२ कॅरेट - ९७,२५० रुपये

सोन्याच्या किमती कशा ठरतात?
सोन्याचे आणि चांदीचे दर दररोज अनेक घटकांवरून निश्चित केले जातात.
डॉलर-रुपया विनिमय दर: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अमेरिकन डॉलरमध्ये ठरतात, त्यामुळे डॉलर-रुपया विनिमय दरातील बदलाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो.
आयात शुल्क आणि कर: भारतात बहुतांश सोने आयात केले जाते. त्यामुळे आयात शुल्क (कस्टम ड्युटी), जीएसटी आणि इतर स्थानिक कर किमतीवर परिणाम करतात.

वाचा - GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
जागतिक परिस्थिती: युद्ध, आर्थिक मंदी किंवा व्याजदरांमधील बदलांसारख्या जागतिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाला निवडतात, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि दर वाढतात.

Web Title: Gold Rate Today Gold Price Hits Record High of ₹1.06 Lakh in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.