Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > युद्धाच्या वणव्यात सोन्याचा भडका! २४ कॅरेट सोन्याने ओलांडला १.७० लाखांचा टप्पा; चांदीही मागे नाही

युद्धाच्या वणव्यात सोन्याचा भडका! २४ कॅरेट सोन्याने ओलांडला १.७० लाखांचा टप्पा; चांदीही मागे नाही

Gold Price Hike: इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात तणाव वाढला आहे, ज्यामुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:02 IST2026-03-03T13:02:11+5:302026-03-03T13:02:49+5:30

Gold Price Hike: इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात तणाव वाढला आहे, ज्यामुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

Gold Prices Skyrocket Amid Iran-Israel War 24K Gold Crosses ₹1.72 Lakh in India | युद्धाच्या वणव्यात सोन्याचा भडका! २४ कॅरेट सोन्याने ओलांडला १.७० लाखांचा टप्पा; चांदीही मागे नाही

युद्धाच्या वणव्यात सोन्याचा भडका! २४ कॅरेट सोन्याने ओलांडला १.७० लाखांचा टप्पा; चांदीही मागे नाही

Gold Price : मध्यपूर्वेतील इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने जागतिक ऊर्जा आणि कमोडिटी बाजारात भूकंप आणला आहे. युद्धाच्या वाढत्या व्याप्तीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली असून, सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याचा दर चक्क १,७२,८०० रुपयांवर पोहोचला असून, एकाच दिवसात ८,१०० रुपयांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे.

जागतिक बाजारपेठेत खळबळ 
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर ५,३६० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. गेल्या चार सत्रांत सोन्यात ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ले सुरूच ठेवण्याचे संकेत दिल्याने बाजारात अनिश्चितता वाढली आहे. इराणने तेल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य केले असून 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधील शिपिंग रोखण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेतील ताजी स्थिती 
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा एप्रिल २०२६ चा वायदा ४,०९५ रुपयांनी वधारून १,६६,१९९ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. 'इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'नुसार (IBJA) विविध कॅरेटचे दर खालीलप्रमाणे आहेत:

सोन्याचा प्रकार किंमत (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट १,६७,४७१ 
२३ कॅरेट १,६६,८०० 
२२ कॅरेट १,५३,४०३ 
१८ कॅरेट १,२५,६०३ 
१४ कॅरेट ९७,९७१ 

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

शहर २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) २२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम)
पुणे / मुंबई / नागपूर१,७०,५१० १,५६,३०० 
नाशिक १,७०,५४० १,५६,३३० 
नवी दिल्ली / लखनौ १,७०,६६० १,५६,४५० 
चेन्नई१,७०,८४० १,५६,६०० 
अहमदाबाद / इंदूर १,७०,५६० १,५६,३५० 

वाचा - FD गुंतवणूकदारांची चांदी! मुथूट, श्रीरामसह 'या' बँका देतायत जबरदस्त व्याज; पाहा टॉप ५ बँकांची यादी

चांदी आणि इतर धातूंमध्येही तेजी 
केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सिंगापूर मार्केटमध्ये चांदी १.९ टक्क्यांनी वधारून ९१.११ डॉलरवर पोहोचली आहे. प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.
 

Web Title : युद्ध के डर से सोने की कीमतों में उछाल; चांदी भी साथ

Web Summary : युद्ध के कारण अनिश्चितता से सोने की तेजी। 24 कैरेट सोना ₹1,72,800 पर, एक रिकॉर्ड उच्च। वैश्विक बाजार में उथल-पुथल के बीच चांदी और अन्य धातुओं में भी लाभ।

Web Title : Gold prices surge amidst war fears; silver follows suit.

Web Summary : War-driven uncertainty fuels gold rush. 24-carat gold hits ₹1,72,800, a record high. Silver and other metals also see gains amid global market turmoil.