Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर

Gold Price Today 10 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहे सोन्याचा नवा दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:49 IST2026-02-10T14:49:10+5:302026-02-10T14:49:10+5:30

Gold Price Today 10 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहे सोन्याचा नवा दर.

Gold price Today 10 February 2026 Change in gold price in bullion market Check the price of 14 to 24 carats quickly before buying | Gold Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर

Gold Price Today 10 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७ रुपयांनी महाग होऊन १५५७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. असे असलं तरी, सोनं आपल्या १७६१२१ रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरापेक्षा अजूनही २०४२१ रुपयांनी स्वस्त आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आज १६०३७१ रुपयांवर पोहोचलाय. 

दुसरीकडे, प्लॅटिनमच्या दरात २१६ रुपयांची घसरण झाली असून तो ६६६३६ रुपयांवर आला आहे. सोमवारी जीएसटीशिवाय सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १५५५९३ रुपयांवर बंद झाला होता. आयबीजेए (IBJA) द्वारे हे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात.

आरबीआयकडून उद्योजकांना मोठी भेट: ₹२० लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार, कसा करू शकता अर्ज?

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे ताजे दर

२२ कॅरेट सोन्याच्या दरात ९८ रुपयांची किरकोळ वाढ झाली असून तो १४२६२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जीएसटीसह हा दर १४६८९९ रुपयांवर गेला आहे. त्याचबरोबर १८ कॅरेट सोन्यातही केवळ ८० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून आज त्याचा दर ११६७७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. १८ कॅरेट सोन्याची जीएसटीसह किंमत आता १२०२७८ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याची स्थिती

१४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६३ रुपयांची वाढ होऊन तो ९१०८५ रुपयांवर उघडला असून जीएसटीसह हा दर ९३८१७ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. तसेच २३ कॅरेट सोन्याचा दर आज १०७ रुपयांनी वाढून १५५०७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटी समाविष्ट केल्यानंतर २३ कॅरेट सोन्याची किंमत आता १५९७२९ रुपये इतकी झाली आहे.

Web Title : सोने की दर में बदलाव: खरीदने से पहले 14 से 24 कैरेट की दरें जांचें।

Web Summary : सराफा बाजार में सोने की कीमतों में वृद्धि; 24 कैरेट सोना ₹155700 प्रति 10 ग्राम पर पहुंचा। 22, 18, 14, और 23 कैरेट सोने की कीमतों में भी बदलाव। प्लैटिनम में गिरावट। खरीदने से पहले दरें जांचें।

Web Title : Gold Rate Fluctuates: Check 14 to 24 Carat Prices Before Buying.

Web Summary : Gold prices rise in Sarafa market; 24 Carat gold reaches ₹155700 per 10 grams. Prices for 22, 18, 14, and 23 Carat gold also see changes. Platinum decreases. Check rates before purchase.