Gold Silver Rate : गेल्या वर्षभरात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यावान धातूंनी शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा दिला आहे. मधे सोन्या-चांदीचे भाव थोड्या प्रमाणात घसरले होते. मात्र, आज सोमवार, १५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
आजचे दर
सोन्याचा फेब्रुवारी फ्युचर दर ०.७२ टक्क्यांनी वाढून १,३४,५८० रुपये प्रति १० ग्रॅम पातळीवर पोहोचला. तर चांदीचा मार्च फ्युचर दर १.३६ टक्क्यांच्या शानदार वाढीसह १,९५,४६६ रुपये प्रति किलोग्राम दराने व्यवहार करत होता. याआधी, शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी सोन्याने एमसीएक्सवर विक्रमी उच्चांक गाठला होता.
दरवाढीची प्रमुख कारणे
- अमेरिकन डॉलरचे मूल्य कमी: अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये ०.१०% ची घसरण नोंदवण्यात आली. डॉलर कमकुवत झाल्यास आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक आकर्षक ठरते.
- बाँड यील्डमध्ये घट : १० वर्षांच्या अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्ये (सरकारी रोख्यांवरील परतावा) घट होऊन ती ४.१८% वर आली.
- याव्यतिरिक्त, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात केल्यामुळे सोन्याच्या किमतीत जोरदार तेजी दिसून येत आहे. व्याजदर कपातीचा अर्थ बाजारात पैसा स्वस्त होईल, जो सामान्यतः सोन्यासाठी सकारात्मक संकेत मानला जातो.
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (२४ कॅरेट)
गुड्सरिटर्न्स नुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर (प्रति १० ग्रॅम) खालीलप्रमाणे आहेत.
| शहर | २४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) | २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) |
| मुंबई, पुणे, कोलकाता | १,३४,७३० | १,२३,५०० |
| चेन्नई | १,३५,९३० | १,२४,६०० |
| बंगळूरु, हैदराबाद, केरळ | १,३४,७३० | १,२३,५०० |
| वडोदरा, अहमदाबाद | १,३४,७८० | १,२३,५५० |
वाचा - २०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
