Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

Gold Price Crash Alert : सोने-चांदीतील वाढत्या किमतीमुळे खरेदीदार चिंतेत आहेत. मात्र, हा भाववाढीचा फुगा लवकर फुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञाने दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:13 IST2025-10-08T12:11:06+5:302025-10-08T12:13:07+5:30

Gold Price Crash Alert : सोने-चांदीतील वाढत्या किमतीमुळे खरेदीदार चिंतेत आहेत. मात्र, हा भाववाढीचा फुगा लवकर फुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञाने दिला आहे.

Gold Price Crash Alert Expert Predicts 30-35% Drop, Gold May Fall to ₹77,700 per 10g | सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

Gold Price Crash Alert : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने विक्रमी वाढ होत आहे. सणासुदीत दोन्ही मौल्यवान धातू नव्या उच्चांकावर पोहोचतील, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. मात्र, एका मोठ्या तज्ज्ञाने किमतीचा फुगा फुटणार असल्याचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची तेजी टिकाऊ नाही आणि सोन्याचा भाव लवकरच १,२२,००० रुपयांवरून ७७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत घसरू शकतो.

सोन्याचा भाव कोसळणार?
PACE 360 चे सह-संस्थापक आणि मुख्य जागतिक रणनीतिकार अमित गोयल यांचे स्पष्ट मत आहे की, सोने आणि चांदीच्या किमती सध्या त्यांच्या खऱ्या मूल्यापेक्षा खूप वर पोहोचल्या आहेत. त्यांची कंपनी २.४ अब्जाहून अधिक मालमत्ता व्यवस्थापित करते.

गोयल यांच्या मते, "गेल्या ४० वर्षांत केवळ दोनदाच असे घडले आहे, जेव्हा डॉलर इंडेक्स कमकुवत असूनही सोने-चांदीने एवढी उत्कृष्ट कामगिरी केली. दोन्ही वेळा त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली होती. सध्याची वाढ ही 'गोल्ड आणि सिल्वरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पार्टी' आहे."

किती होणार घसरण?
गोयल यांनी ऐतिहासिक डेटाचा संदर्भ देत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सोन्याचा अंदाज : गोयल यांचा अंदाज आहे की, सोन्यात ३०-३५% ची घसरण येऊ शकते. यापूर्वी २००७-०८ आणि २०११ मध्ये मोठी तेजी आल्यानंतर सोन्याच्या किमतीत ४५% पर्यंत घसरण झाली होती. तसे झाल्यास, भारतातील सोन्याचा भाव सध्याच्या १,२२,००० रुपयांवरून थेट ७७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो.

चांदीचा अंदाज : चांदीमध्ये सध्या सर्वाधिक उसळी दिसत असल्याने, त्यात किमान ५०% पर्यंत घसरण शक्य आहे. म्हणजेच, चांदीचा भाव १,५४,९०० रुपयांवरून घसरून ७७,४५० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो.

घसरणीची दोन मोठी कारणे

  • मानसिक मर्यादा: सध्याची तेजी एका मानसिक मर्यादेच्या जवळ पोहोचली आहे, जी सामान्यतः कोणत्याही मोठ्या तेजीच्या रॅलीचा शेवट दर्शवते. यानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढेल.
  • जागतिक मंदीचा धोका: अमित गोयल यांच्या अंदाजानुसार, पुढील २-३ वर्षांत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक गहन जागतिक मंदी येऊ शकते. या मंदीमुळे सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि फोटोवोल्टेइकसारख्या उद्योगांची मागणी कमकुवत होईल, ज्यामुळे चांदीच्या औद्योगिक मागणीत मोठी घट होईल.

वाचा - टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी

गुंतवणुकीची खरी संधी कधी?
गोयल यांनी गुंतवणूकदारांना तात्काळ खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, सोने आंतरराष्ट्रीय बाजारात २,६०० ते २,७०० डॉलर प्रति औंस या स्तरावर आल्यास, ते पुन्हा एकदा जगातील सर्वात सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक बनेल.
 

Web Title : सोने की कीमतों का गुब्बारा फूटेगा? विशेषज्ञ ने ₹77,700 तक गिरावट की भविष्यवाणी की

Web Summary : विशेषज्ञों ने सोने और चांदी की कीमतों में तेज़ी को बुलबुला बताया है। सोने में 30-35% की गिरावट से कीमतें ₹77,700/10 ग्राम तक गिर सकती हैं। वैश्विक मंदी और मनोवैज्ञानिक सीमाएँ गिरावट के कारण हैं। निवेशकों को बेहतर एंट्री पॉइंट का इंतजार करना चाहिए।

Web Title : Gold Price Bubble Burst? Expert Predicts Sharp Fall to ₹77,700

Web Summary : Expert warns gold, silver prices are inflated. A potential 30-35% gold crash could bring prices to ₹77,700/10 grams. Global recession and psychological limits are cited as reasons for the predicted fall. Investors should wait for better entry points.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.