Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर

सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर

Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने सोन्याने ४ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. १४ वर्षांत प्रथमच चांदी ४० डॉलर प्रति औंसच्या वर गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 11:44 IST2025-09-01T11:27:42+5:302025-09-01T11:44:58+5:30

Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने सोन्याने ४ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. १४ वर्षांत प्रथमच चांदी ४० डॉलर प्रति औंसच्या वर गेली आहे.

Gold and Silver Prices Surge to Record Highs Silver Crosses $40 | सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर

ai generated images

Gold Silver Price: तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, तुमच्या सोन्याची किंमत आता सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. एमसीएक्स (MCX) वर सोन्याने १,०५,००० प्रति १० ग्रॅमचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांक गाठला. तर, जागतिक बाजारात सोने चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आणि चांदी १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच ४० प्रति औंस डॉलरपेक्षा जास्त झाली.

विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून या महिन्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये ही वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर आणि अमेरिकेच्या टॅरिफमुळे वाढलेल्या अनिश्चिततेवर आहे.

बाजारला मिळाले मजबूत संकेत
सिटी इंडेक्सचे वरिष्ठ विश्लेषक मॅट सिम्पसन यांनी सांगितले की, फेडच्या मेरी डेली यांच्या विधानांमुळे बाजाराला मजबूत संकेत मिळाले आहेत. डेली यांनी म्हटले होते की, श्रम बाजारावर वाढते धोके लक्षात घेता त्या व्याजदरात कपातीचे समर्थन करतात. सीएमई फेडवॉच टूलनुसार, ट्रेडर्स सध्या ८७ टक्के शक्यता व्यक्त करत आहेत की फेड या महिन्यात ०.२५ टक्के (२५ बेसिस पॉइंट) ची दर कपात करेल.

आता पेरोल डेटावर गुंतवणूकदारांचे लक्ष
अमेरिकेचा पर्सनल कन्झम्प्शन एक्सपेंडिचर्स (PCE) प्राईस इंडेक्सचा ताजा डेटाही अपेक्षेनुसार आल्याने फेडला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, एका अमेरिकन न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुतांश टॅरिफला अवैध ठरवले आहे, ज्यामुळे डॉलरवर दबाव वाढला आणि सोन्याच्या किमतीला आधार मिळाला. आता गुंतवणूकदारांची नजर शुक्रवारी येणाऱ्या अमेरिकेच्या नॉन-फार्म पेरोल डेटावर आहे, जो फेडच्या दर कपातीच्या आकारावर परिणाम करू शकतो.

सोने आणि चांदीचे आजचे दर
कॉमेक्सवर (COMEX) सोने: ०.७० टक्के वाढीसह ३५४०.८० प्रति औंस डॉलर
कॉमेक्सवर चांदी: १.८३ टक्के वाढीसह ४०.९३५ प्रति औंस डॉलर
इतर मौल्यवान धातूंमध्येही वाढ नोंदवली गेली. प्लॅटिनम ०.९ टक्के वाढून १,३७६.९५ डॉलर आणि पॅलेडियम ०.८ टक्के वाढून १,११८.१२ डॉलरवर पोहोचले.

एमसीएक्स म्हणजे काय?
एमसीएक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा भारतातील एक प्रमुख वस्तू वायदा बाजार आहे. या एक्सचेंजवर सोने, चांदी, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि इतर अनेक वस्तूंच्या किमती ठरवण्यासाठी त्यांचे व्यवहार (ट्रेडिंग) केले जातात.

वाचा - तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे ५ नियम; आजपासून गॅस, प्रवास आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदल

हे एक असे व्यासपीठ आहे, जे गुंतवणूकदारांना वस्तूंच्या भविष्यातील किमतीवर व्यापार करण्याची संधी देते. त्यामुळे, जेव्हा बातम्यांमध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दर "एमसीएक्सवर" वाढले किंवा कमी झाले असे म्हटले जाते, तेव्हा ते याच एक्सचेंजवरील किमतींबद्दल बोलत असतात.
 

Web Title: Gold and Silver Prices Surge to Record Highs Silver Crosses $40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.