Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > जागतिक बाजारात नफावसुलीचा धडाका! सोन्याची झळाळी कमी, तर चांदी दीड टक्क्यांनी कोसळली

जागतिक बाजारात नफावसुलीचा धडाका! सोन्याची झळाळी कमी, तर चांदी दीड टक्क्यांनी कोसळली

Gold Silver Rate : शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली, आजच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती 6,000 रुपयांपर्यंत घसरल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:04 IST2026-01-16T15:04:51+5:302026-01-16T15:04:51+5:30

Gold Silver Rate : शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली, आजच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती 6,000 रुपयांपर्यंत घसरल्या.

Gold and Silver Prices Drop on MCX Gold Down by ₹721, Silver Slides 1.5% on Jan 16 | जागतिक बाजारात नफावसुलीचा धडाका! सोन्याची झळाळी कमी, तर चांदी दीड टक्क्यांनी कोसळली

जागतिक बाजारात नफावसुलीचा धडाका! सोन्याची झळाळी कमी, तर चांदी दीड टक्क्यांनी कोसळली

Gold Silver Rate : जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबतच्या धूसर चिन्हांमुळे आज शुक्रवारी (१६ जानेवारी) भारतीय कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७२१ रुपयांची घट झाली, तर चांदीच्या दरात दीड टक्क्यांहून अधिकची पडझड नोंदवण्यात आली.

एमसीएक्सवरील आजची स्थिती
आज सकाळच्या सत्रात सोने ७२१ रुपयांनी स्वस्त होऊन १,४२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या स्तरावर आले.
चांदीच्या दरात ६,०६४ रुपयांची (१.५%) मोठी घसरण होऊन ती २,८५,५१३ रुपये प्रति किलोच्या इंट्राडे निचांकावर पोहोचली.

जागतिक बाजारातही 'विक्री'चा दबाव

  • केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव दिसून येत आहे.
  • गोल्ड फ्यूचर्स : अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स ०.५ टक्क्यांनी घसरून ४,५९४.८१ डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
  • स्पॉट सिल्वर : स्पॉट सिल्वर देखील ०.८ टक्क्यांनी घसरून ९१.६८ डॉलरवर आली आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय तणाव कमी होण्याचे संकेत आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटल्यामुळे गुंतवणूकदार आता नफा बुक करत आहेत.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

'गुड रिटर्न्स'नुसार, देशातील प्रमुख शहरांत आज सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.

शहर/स्थान२४ कॅरेट सोने (₹) २२ कॅरेट सोने (₹) 
मुंबई/पुणे १,४३,४०० १,३१,४५० 
दिल्ली १,४३,५५० १,३१,६०० 
चेन्नई १,४४,३३० १,३२,३०० 
बेंगलुरु / हैदराबाद १,४३,४०० १,३१,४५० 
अहमदाबाद १,४३,४५० १,३१,५०० 

वाचा - इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची उसळी! नफ्यात घट होऊनही गुंतवणूकदारांची तुफान खरेदी; काय आहे कारण?

विश्लेषकांचे मत
अमेरिकन फेडरल पॉलिसीबाबतची अनिश्चितता हे या घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे. जोपर्यंत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरांबाबत स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत बाजारात असाच चढ-उतार पाहायला मिळू शकतो. ही घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी ठरू शकते, असेही काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
 

Web Title : वैश्विक बाजार में मुनाफावसूली से सोना लुढ़का, चांदी में भारी गिरावट।

Web Summary : वैश्विक अनिश्चितता और अमेरिकी फेडरल रिजर्व की ब्याज दर में कटौती के अस्पष्ट संकेतों के बीच सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। सोना 721 रुपये प्रति 10 ग्राम गिरा, जबकि चांदी 1.5% से अधिक लुढ़क गई। विश्लेषकों ने मुनाफावसूली को इसका कारण बताया।

Web Title : Global profit-booking hits gold, silver plunges amid rate uncertainty.

Web Summary : Gold and silver prices fell sharply due to global uncertainty and unclear US Federal Reserve rate cut signals. Gold fell by ₹721 per 10 grams, while silver plummeted over 1.5%. Analysts cite profit-booking and reduced safe-haven demand.