Lokmat Money >गुंतवणूक > EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?

EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?

EPFO News: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:26 IST2025-04-25T13:26:15+5:302025-04-25T13:26:15+5:30

EPFO News: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे.

EPFO will give Rs 5 lakh in 3 days work will be done without documents you can withdraw with atm | EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?

EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?

EPFO News: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओ सदस्याला कागदपत्रांशिवाय ३ दिवसात ५ लाख रुपये मिळतील. किंबहुना आगाऊ दाव्यांच्या ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढली आहे. ही मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ईपीएफओच्या साडेसात कोटी सदस्यांचे सेटलमेंट सोपं होणार आहे.

आता मर्यादा काय?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांना दिलासा देण्यासाठी मोठी योजना आखत आहे. सध्या ऑटो क्लेम सेटलमेंट लिमिट एक लाख रुपये आहे, जी मे २०२४ मध्ये ५०,००० रुपयांवरून वाढवण्यात आली. पण आता ही मर्यादा पाचपटीने वाढवून थेट पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचा थेट फायदा त्या सदस्यांना होणार आहे ज्यांना मेडिकल इमर्जन्सी, घराची दुरुस्ती, लग्न किंवा उच्च शिक्षण यासारख्या प्रकरणांमध्ये निधीची गरज जाणवते.

ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या

ऑटो क्लेम सेटलमेंट सुविधा दुप्पट

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ९० लाख लोकांनी ऑटो क्लेम सेटलमेंटचा लाभ घेतला, जो २०२४-२५ मध्ये २ कोटीपर्यंत वाढू शकतो. डिजिटल प्रक्रियेचा लोकांना किती फायदा झाला, हे या आकडेवारीवरून दिसून येते. यापूर्वी एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ईपीएफओ कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणं आवश्यक होतं, आता या मर्यादा वाढीमुळे त्याची गरज भासणार नाही. म्हणजेच अवघ्या ३ दिवसात तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुमच्या कामासाठी ५ लाख रुपये मिळतील.

ईपीएफओ नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) सोबत एक तांत्रिक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे जून २०२५ पासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ काढण्याची परवानगी मिळेल. हे अगदी बँक खात्यातून एटीएममधून पैसे काढण्यासारखेच असेल. सीबीटीच्या (केंद्रीय विश्वस्त मंडळ) पुढील बैठकीत या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: EPFO will give Rs 5 lakh in 3 days work will be done without documents you can withdraw with atm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.