Lokmat Money >गुंतवणूक > कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर

कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर

EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:50 IST2025-02-28T13:49:25+5:302025-02-28T13:50:12+5:30

EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

epfo board panel fixes 8 25 percent interest rate on epf deposits for fy 2024 25 | कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर

कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर

EPFO Interest Rate : देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) गुंतवणूक व लेखा समितीने संस्थेच्या उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घेतला. ज्यामध्ये बोर्डानं ठेवीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पीएफच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात सेवानिवृत्ती संस्था ईपीएफओने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे.

EPFO बोर्डाच्या बैठकीत सूत्रांनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ८.२५% व्याजदर निश्चित केला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) २८ फेब्रुवारीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

२०२२ मध्ये व्याजदरात मोठी कपात
यापूर्वी मोदी सरकारने २०२२ वर्षात व्याजदरात मोठी कपात केली होती. ७ कोटींहून अधिक सदस्यांसाठी २०२१-२२ साठी व्याजदर ८.५% वरुन ८.१% करण्यात आला होता. CNBC च्या अहवालानुसार, ईपीएफओ​​ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत २०२४-२५ साठी EPF वर ८.२५% व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२०-२१ साठी EPF वर ८.१% व्याज दर १९७७-७८ नंतर सर्वात कमी होता, जेव्हा EPF व्याजदर ८% होता. मार्च २०२० मध्ये, ईपीएफओ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर २०१८-१९ साठी प्रदान केलेल्या ८.६५% च्या तुलनेत २०१९-२० साठी ८.५% या ७ वर्षांच्या नीचांकावर आणला होता.

EPFO काय आहे?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही एक आर्थिक संस्था आहे. ही संघटना, कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही योजना व्यवस्थापित करते.  हे मंडळ भारतातील संघटित क्षेत्रात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना आणि विमा योजना प्रशासित करते. ग्राहकांच्या आणि तिच्याद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणात ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे.

Web Title: epfo board panel fixes 8 25 percent interest rate on epf deposits for fy 2024 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.