How to be rich : आजकाल सोशल मीडियावर 'झटपट श्रीमंत होण्याच्या' टिप्स आणि 'हॉट स्टॉक टिप्स'ची गर्दी दिसत असली तरी, संपत्ती निर्माण करण्याची खरी पद्धत अत्यंत सोपी आहे. आर्थिक तज्ज्ञांनी अलीकडेच एक 'श्रीमंत होण्याचा मंत्र' शेअर केला आहे, जो दरमहा १ लाख कमवणाऱ्यांपासून १० लाख रुपये कमवणाऱ्या प्रत्येकासाठी लागू आहे. तज्ज्ञांच्या मत आहे की, श्रीमंती ही जास्त रिटर्न्स मिळवण्याने नव्हे, तर चांगल्या सवयींनी बनते. शांतता आणि सातत्य राखणाऱ्या लोकांकडेच खरी दौलत जाते.
१. श्रीमंत होण्याच्या दोन 'सिक्रेट' सवयी
पहिली सवय: चक्रवाढ व्याजाची ताकद
चक्रवाढ व्याज म्हणजे संपत्ती वाढवण्याची गुरुकिल्ली मानली जाते. उदाहरणार्थ जर तुम्ही दरमहा २५,००० रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यावर १२% वार्षिक परतावा मिळाला, तर ५ वर्षांत तुमच्याकडे सुमारे २० लाख रुपये होतील. मात्र, हाच गुंतवणूक प्रवास तुम्ही २० वर्षे चालू ठेवला, तर ही रक्कम २.४ कोटी रुपये होईल! तुमच्या गुंतवणुकीच्या सुरुवातीस तुम्हाला वेळ द्यावा लागतो. जितक्या लवकर सुरुवात कराल, तितका जास्त फायदा मिळतो.
२. दुसरी सवय: पोर्टफोलिओ रिबॅलेंसिंग
रिबॅलेंसिंग म्हणजे वेळेनुसार तुमच्या गुंतवणुकीत बदल करणे, ज्यामुळे इक्विटी आणि डेट फंड्सचे योग्य संतुलन कायम राहते. जर तुम्ही सुरुवात ७०% इक्विटी आणि ३०% डेटने केली, पण बाजार वाढल्यामुळे हे प्रमाण ८५:१५ झाले, तर रिबॅलेंसिंगमुळे तुम्ही वाढलेला इक्विटीचा हिस्सा विकून पुन्हा ७०:३० हे संतुलन साधणे होय. "हे एखाद्या झाडाची छाटणी करण्यासारखे आहे. छाटणी झाडाला नुकसान पोहोचवण्यासाठी नव्हे, तर ते अधिक मजबूत करण्यासाठी केली जाते." "चक्रवाढ व्याज संपत्ती निर्माण करते, तर रिबॅलेंसिंग त्या संपत्तीचे संरक्षण करते. एक तुमच्या धैर्याचे बक्षीस आहे, तर दुसरे तुमच्या वाढीची सुरक्षा."
डेट फंड्स गुंतवणुकीत का महत्त्वाचे आहेत?
- अनेक लोक शेअर बाजार किंवा इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करतात, पण डेट फंड्सकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, पोर्टफोलिओमध्ये स्थिरता राखण्यासाठी डेट फंड्स आवश्यक आहेत.
- डेट फंड्स सरकार किंवा कंपन्यांना कर्ज देतात. त्यामुळे यात जोखीम कमी असते. शेअर बाजाराच्या अस्थिरतेपासून घाबरलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे सुरक्षित आणि स्थिर परताव्याचा पर्याय आहे.
- तुमचा पोर्टफोलिओ फक्त शेअर्समध्ये गुंतलेला असेल आणि बाजार कोसळल्यास मोठे नुकसान होऊ शकते. डेट फंड्स अशा वेळी संतुलन राखतात, कारण इक्विटी घसरल्यावरही ते स्थिर परतावा देत राहतात.
अनेक डेट फंड्समध्ये लॉक-इन कालावधी नसतो. त्यामुळे गरज पडल्यास एफडीच्या तुलनेत डेट फंडमधून लवकर पैसे काढणे सोपे होते.
दीर्घकालीन डेट फंड्समध्ये (३ वर्षांहून अधिक गुंतवणूक) इंडेक्सेशनचा फायदा मिळतो, ज्यामुळे एफडीच्या तुलनेत कर खूप कमी लागतो.
संपत्ती निर्माण करण्यासाठी रिटर्न्सचा पाठलाग करण्याऐवजी शिस्त, गुंतवणूक सातत्य आणि योग्य संतुलन यावर लक्ष केंद्रित करा. या सवयी तुमच्या नियंत्रणात आहेत आणि दीर्घकाळात याच सवयी तुम्हाला श्रीमंत बनवतील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
