lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हा पैसा आता कुठेही वापरता येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 05:01 PM2024-03-17T17:01:16+5:302024-03-17T17:02:18+5:30

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हा पैसा आता कुठेही वापरता येणार नाही.

Byjus Crisis: Another blow to Byju's; 4400 crore rupees frozen by the court, know the case? | Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

Byju's Update: एडटेक कंपनी Byju's च्या अडचणीत वाढ झाली आहे. अलीकडेच कंपनीने आपली सर्व कार्यालये बंद करुन कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता कंपनीला आणखी एक झटका बसला आहे. अमेरिकेतील बँकरप्‍सी कोर्टाने Byju's ला कर्ज देणाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असून, $533 मिलियन(रु. 4400 कोटी) कर्जाची रक्कम फ्रीज केली आहे. या मोठ्या रकमेवरून Byju's आणि कर्जदारांमध्ये वाद सुरू आहे.

कर्जदारांच्या गटाने सांगितले की, हे पैसे पूर्वी हेज फंड Camshaft Capital कडे होते. ते आता परदेशी ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशात हा पैसा कुठेही वापरता येणार नाही, असे म्हटले आहे. न्यायालयाने दिलेला हा आदेश बायजूविरोधात कायदेशीर लढा देणाऱ्या कर्जदारांचा विजय मानला जात आहे. न्यायालयाने बायजूचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ यांना आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे.

विल्यम मोटर्नला अटक करण्याचे आदेश दिले
कॅमशाफ्ट कॅपिटलचे संस्थापक विल्यम मॉर्टन यांना न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल, तसेच $533 मिलियन डॉलर्सचे हस्तांतरण आणि पैशाची सद्यस्थितीची माहिती देण्यास नकार दिल्याबद्दल अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. थिंक अँड लर्न ही मूळ कंपनी पैसा कुठे लपवण्याचा प्रयत्न करत आहे, ही मोठी गोष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

 

 

Web Title: Byjus Crisis: Another blow to Byju's; 4400 crore rupees frozen by the court, know the case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.