reliance jio news more data offering on 11 rupees plan even airtel launches two new plans | Reliance Jio च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल अधिक डेटा

Reliance Jio च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल अधिक डेटा

ठळक मुद्देया प्लॅनमध्ये मिळणार अधिक फायदायापूर्वी एअरटेलनही लाँच केले होते दोन नवे प्लॅन्स

Reliance Jio ने आपल्या एका स्वस्त प्लॅनमध्ये बदल केला आहे. आता त्याअंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त फायदाही मिळणार आहे. जिओनं आपल्या ११ रूपयांच्या प्लॅनमध्ये बदल केला असून पहिल्याच्या तुलनेत आता अधिक डेटा मिळणार आहे. नव्या बदलांसह 4G डेटा व्हाऊचर कंपनीनं वेबसाईटवर लिस्ट केलं आहे.

जिओच्या ११ रूपयांच्या 4G डेटा व्हाऊचरमध्ये ग्राहकांना आता १ जीबी डेटा देण्यात येणार आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये ८०० एमबी इतका डेटा देण्यात येत होता. तसंच हा प्लॅन कोणत्याही व्हॅलिडिटीशिवाय येतो. हा एक अॅड ऑन प्लॅन आहे. याची वैधता तुमच्या बेस प्लॅनशीच लागू होणार आहे. सध्या जिओकडे २१ रूपये, ५१ रूपये आणि १०१ रूपयांचे अॅड ऑन प्लॅन्सदेखील आहेत. यामध्ये अनुक्रमे २ जीबी, ६ जीबी आणि १२ जीबी डेटा देण्यात येतो. 

सध्या जिओकडे स्टँडअलोन प्लॅन्सदेखील आहेत. हे प्लॅन १५१, २०१ आणि २५१ रूपयांना मिळतात. हे सर्व प्लॅन्स वर्क फ्रॉम होम कॅटेगरीत येतात. यामध्ये अनुक्रमे ३० जीबी, ४० जीबी आणि ५० जीबी डेटा दिला जातो. या तिनही प्लॅन्सची व्हॅलिडीटी ३० दिवसांची आहे. यापूर्वी बुधवारी एअरटेलनही दोन नवे डेटा व्हाऊचर्स लाँच केले. हे ७८ रूपये आणि २४८ रूपये किंमतीचे आहेत. यामध्ये अनुक्रमे ५ जीबी आणि २५ जीबी डेटा देण्यात येतो. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: reliance jio news more data offering on 11 rupees plan even airtel launches two new plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.