Raymond Realty Stock Listing: मंगळवारी बीएसईवर रेमंड रिअल्टीचे शेअर्स १००५ रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर लगेचच, रेमंड रिअल्टीचे शेअर्स बीएसईवर ५% च्या अपर सर्किटवर १०५५.२० रुपयांवर पोहोचले. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची डिस्कव्हर्ड प्राईज १०३१.३० रुपये होती. तर, कंपनीचे शेअर्स एनएसईवर १००० रुपयांना लिस्ट झाले. एनएसईवर रेमंड रिअल्टीच्या शेअर्सची डिस्कव्हर्ड प्राईज १०३९.३० रुपये होती. रेमंड लिमिटेडमधून डिमर्जर झाल्यानंतर रेमंड रिअल्टीचे शेअर्स लिस्ट झालेत. मंगळवारी रेमंड लिमिटेडच्या शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून येत आहे.
एकावर १ शेअर मिळाला
विलयीकरणाच्या अटींनुसार, रेमंड लिमिटेडच्या भागधारकांना प्रत्येक शेअरसाठी रेमंड रियल्टीचा १ शेअर मिळाला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायात थेट एक्सपोजर मिळालाय. रेमंड रिअल्टीचं १ मे २०२५ रोजी रेमंड लिमिटेडमधून डिमर्जर झालं होतं. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, कंपनीचा EBITDA आणि महसूल अनुक्रमे १९४ कोटी आणि ७६६ कोटी रुपये होता. त्याच वेळी, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, कंपनीच्या महसूल आणि EBITDA मध्ये वार्षिक आधारावर ४५ टक्के आणि ३७ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, कंपनीचा महसूल आणि EBITDA अनुक्रमे २३१३ कोटी आणि ५०७ कोटी रुपये होता. रेमंड रिअल्टी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३००० कोटी रुपयांच्या विक्री बुकिंग मूल्याचं टार्गेट ठेवत आहे.
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
रेमंड लिमिटेडचे शेअरही वधारले
मंगळवारी बीएसईमध्ये रेमंड लिमिटेडचे शेअर्स ७% पेक्षा जास्त वाढून ७७१.४० रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच दिवसांत रेमंड लिमिटेडचे शेअर्स २७% पेक्षा जास्त वधारले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स ५९९.८५ रुपयांवरून ७७० रुपयांवर पोहोचलेत. रेमंड लिमिटेडच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १२४३.५१ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ४३१.१० रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)