८८% लोकांना त्यांच्या दर्जाचं काम मिळेना

देशातील ५२ टक्के लोकांचे शिक्षणही प्राथमिक पातळीच्या आतील आहे.

२०२३-२४ मध्ये भारतातील श्रमशक्तीतील ८८ टक्के लोक कमी योग्यतेच्या क्षेत्रात कार्यरत होते, असं ‘इन्स्टिट्यूशन फॉर कॉम्पिटिटिव्हनेस’नं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे.

अहवालानुसार, वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये केवळ १० ते १२ टक्के लोक उच्च योग्यता असलेल्या पदांवर काम करीत होते. उरलेले ८८ टक्के लोक कमी योग्यतेच्या क्षेत्रात कार्यरत होते. 

याशिवाय देशातील ५ क्षेत्रांकडे ६६ टक्के व्यावसायिक प्रशिक्षण एकवटले आहे.

आयटी, आयटीईएस, वस्त्रोद्योग व परिधान, इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्यसेवा व आयुर्विज्ञान आणि सौंदर्य व जीवनशैली ही ती क्षेत्रं आहेत. 

देशाच्या श्रमशक्तीतील केवळ ९.७६ % लोकसंख्येने माध्यमिक पातळीपेक्षा पुढचे शिक्षण प्राप्त केले आहे. ५२ टक्के लोकांचे शिक्षण प्राथमिक पातळीच्या आतील आहे.

Click Here