lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिजिटल व्यवहारांसाठी युजर्सची Paytm ला पसंती; सलग दुसऱ्या महिन्यात 1 अब्जाहून अधिक व्यवहार! 

डिजिटल व्यवहारांसाठी युजर्सची Paytm ला पसंती; सलग दुसऱ्या महिन्यात 1 अब्जाहून अधिक व्यवहार! 

paytm leads india digital payments : पेटीएमने आपल्या UPI (Unified Payments Interface) वॉलेटद्वारे डिजिटल व्यवहारात 1 अब्जचा आकडा ओलांडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 02:15 PM2021-03-02T14:15:22+5:302021-03-02T14:16:39+5:30

paytm leads india digital payments : पेटीएमने आपल्या UPI (Unified Payments Interface) वॉलेटद्वारे डिजिटल व्यवहारात 1 अब्जचा आकडा ओलांडला आहे.

paytm leads india digital payments with 1 billion transactions for 2nd straight month | डिजिटल व्यवहारांसाठी युजर्सची Paytm ला पसंती; सलग दुसऱ्या महिन्यात 1 अब्जाहून अधिक व्यवहार! 

डिजिटल व्यवहारांसाठी युजर्सची Paytm ला पसंती; सलग दुसऱ्या महिन्यात 1 अब्जाहून अधिक व्यवहार! 

Highlightsपेटीएमची मासिक वाढ 15 टक्क्यांहून अधिक आहे. सुमारे 1.70 कोटी व्यापाऱ्यांनी पेटीएमच्या सर्व्हिसला सब्सक्राइब केले आहे, असा कंपनीचा दावा आहे.

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट्स (Paytm ) आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएम डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत युजर्समध्ये पसंतीची पेमेंट अॅप बनले आहे. यामुळेच पेटीएमने दुसर्‍या महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये 1 अब्जच्या आकड्यांचा विक्रम ओलांडला. (paytm leads india digital payments with 1 billion transactions for 2nd straight month)

पेटीएमने आपल्या UPI (Unified Payments Interface) वॉलेटद्वारे डिजिटल व्यवहारात 1 अब्जचा आकडा ओलांडला आहे. हा सलग दुसरा महिना आहे, जो पेटीएमचे व्यवहार 1 अब्जाहून अधिक झाले आहेत. पेटीएमची मासिक वाढ 15 टक्क्यांहून अधिक आहे. सुमारे 1.70 कोटी व्यापाऱ्यांनी पेटीएमच्या सर्व्हिसला सब्सक्राइब केले आहे, असा कंपनीचा दावा आहे.

पेटीएमचे काय म्हणणे आहे?
आम्ही आमच्या वापरकर्त्यांना डिजिटल व्यवहारांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. तसेच, आम्ही मार्केटमध्ये आणखी मजबूत होत आहोत आणि वेगाने पुढे जात आहोत. मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी पेटीएमसह आपला डिजिटल प्रवास सुरू केला, असे पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले.

छोट्या दुकानदारांना डिजिटल पेमेंट करणे सुलभ करण्यासाठी आम्ही इनोव्हेटिव्ह क्यूआर कोड आणला आहे. याशिवाय, कंपनीने देशातील 6 लाखाहून अधिक गावात डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पेटीएमने दिली. त्याचबरोबर 20 लाखाहून अधिक व्यापाऱ्यांना ऑनलाईन व्यवहारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

UPI मध्ये कंपनीची हिस्सेदारी वाढतेय
पेटीएम तेजीमुळे यूपीआयमध्ये आपली हिस्सेदारी वेगाने वाढवित आहे. यूपीआय व्यवहारात पेटीएम पेमेंट्स बँकेचा व्यवहार जानेवारीत 33.26 कोटी होता. याचबरोबर जानेवारीमध्ये फोनपेचे व्यवहार 96.87  कोटी आणि गुगल पेचे 85.35 कोटी झाले आहेत.

Web Title: paytm leads india digital payments with 1 billion transactions for 2nd straight month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.