lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata: टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली

Ratan Tata: टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली

Ratan Tata reaction on Tata Sons leadership change: टाटा सन्सचे कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी टाटा कंपनीमध्ये सीईओ पद निर्माण करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:17 PM2021-09-16T13:17:00+5:302021-09-16T13:19:41+5:30

Ratan Tata reaction on Tata Sons leadership change: टाटा सन्सचे कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी टाटा कंपनीमध्ये सीईओ पद निर्माण करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

no change in Tata Sons leadership; Ratan Tata's first reaction came | Ratan Tata: टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली

Ratan Tata: टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली

टाटा ग्रुपचे नेतृत्व करणाऱ्या टाटा सन्सच्या (Tata Sons) नेतृत्वामध्ये बदल करण्याच्या वृत्ताने उद्योगविश्वात खळबळ उडाली होती. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्यासह खुद्द रतन टाटा (Ratan Tata) यांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, 106 अब्ज डॉलरच्या टाटा ग्रुपच्या या कंपनीच्या नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही. (no leadership structural changes in Tata Sons; Ratan tata react on news.) 

Ratan Tata: एकेकाळी अख्खी कंपनीच विकायला निघालेले रतन टाटा; आज एवढी नफ्यात की...

रतन टाटा टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या वृत्तावर नाराजी व्यक्त केली. समुहामध्ये कोणत्याही नेतृत्व बदलांची शक्यता नाही. यामुळे मी निराश झालो आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ब्लूमबर्ग (Bloomberg) ने याबाबतचे वृत्त दिले होते. यामध्ये टाटा सन्सचे कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी टाटा कंपनीमध्ये सीईओ पद निर्माण करणार असल्याचे म्हटले होते. टाटा सन्सचे सीईओपद हे अध्यक्षापेक्षा खालच्या स्तरावर असेल आणि हा सीईओ 153 वर्षे जुन्या टाटांच्या साम्राज्याला मार्गदर्शन करेल. 

TaTa ने केले गुंतवणूकदारांना मालामाल; या शेअरने वर्षभरात पैसे केले 'डबल'

मात्र, चंद्रशेखरन यांनी सांगितले की, अशा प्रकारचा कोणताही महत्वाचा निर्णय हा बोर्डाच्या एका समितीकडून घेतला जातो. अशा बातम्यांमुळे कंपनीच्या कामात बाधा निर्माण होते. तर रतन टाटा यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या वृत्तामुळे कंपनीच्या टीमचा आत्मविश्वास कमी होतो, जे बाजारात चांगले प्रदर्शन करत असतात.

Web Title: no change in Tata Sons leadership; Ratan Tata's first reaction came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.