lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Yes Bank ला येणार ‘अच्छे दिन’; दोन मोठ्या गुंतवणूकदारांची एन्ट्री होणार, १०० कोटींना होणार डील?

Yes Bank ला येणार ‘अच्छे दिन’; दोन मोठ्या गुंतवणूकदारांची एन्ट्री होणार, १०० कोटींना होणार डील?

Yes Bank च्या शेअरमध्ये महिन्याभरात १५ टक्क्यांपर्यंतची तेजी पाहायला मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:44 PM2022-07-22T15:44:11+5:302022-07-22T15:44:51+5:30

Yes Bank च्या शेअरमध्ये महिन्याभरात १५ टक्क्यांपर्यंतची तेजी पाहायला मिळाली आहे.

yes bank stake to buy two big investors carlyle advent close in on 1 billion dollar yes bank stake share price high | Yes Bank ला येणार ‘अच्छे दिन’; दोन मोठ्या गुंतवणूकदारांची एन्ट्री होणार, १०० कोटींना होणार डील?

Yes Bank ला येणार ‘अच्छे दिन’; दोन मोठ्या गुंतवणूकदारांची एन्ट्री होणार, १०० कोटींना होणार डील?

रोखीच्या संकटाचा सामना करणाऱ्या येस बँकेला लवकरच दिलासा मिळू शकतो. येस बँकेत दोन मोठ्या गुंतवणूकदारांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ईटीच्या वृत्तांनुसार, कार्लाइल आणि अॅडव्हेंट येस बँकेतील 100 कोटी रुपयांचा हिस्सा खरेदी करण्याच्या अगदी जवळ आहेत. दरम्यान, अॅडव्हेंटच्या नेतृत्वाखाली, हाँगकाँगच्या कार्लाइलच्या उच्च अधिकाऱ्यांनी या आठवड्यात येस बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन आणि खाजगी बँकेची सर्वात मोठी भागधारक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तसेच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यांच्याशी अनेक बैठका घेतल्या. मात्र, अॅडव्हेंट आणि कार्लाइल यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्याच वेळी, येस बँक आणि एसबीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सुरुवातीला, येस बँकेकडून कार्लाइल, अॅडव्हेंटला प्राधान्याने वाटप करून सुमारे 2.6 अब्ज शेअर्सचे वाटप केले जाऊ शकते. त्याच वेळी, दोन पीई फंड एकत्रितपणे ₹14-15 प्रति शेअर दराने ₹3,600-3,900 कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. येस बँक जास्तीत जास्त 3.8 अब्ज शेअर्स जारी करू शकते, जेणेकरून SBI चा हिस्सा 26 टक्क्यांवर राहील.

रेग्युलेटर-अप्रुव्ह्ड रिव्हायवल स्कीमनुसार SBI चे बँकेतील स्टेक मार्च 2023 पूर्वी 26 टक्क्यांच्या मर्यादेच्या खाली जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे, जेसी फ्लॉवर्ससोबतचा करार पूर्ण झाल्यानंतर आणि नवीन बोर्ड सदस्यांसाठी भागधारकांच्या मंजुरीनंतर व्यवहार होणे अपेक्षित आहे. येस बँकेने 48,000 कोटी रुपयांची नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) विकण्याच्या उद्देशाने एसेट्स रिकन्स्ट्रक्शन फर्म तयार करण्यासाठी JC Flowers ARC सोबत करार केला आहे.

शेअर्समध्ये तेजी
शुक्रवारी येस बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली असून ते 2.80 टक्क्यांच्या वाढीसह 14.70 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी गुरूवारी बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून 14.30 रूपयांवर बंद झाले होते. महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

Web Title: yes bank stake to buy two big investors carlyle advent close in on 1 billion dollar yes bank stake share price high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.