Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ...! ₹393 वर होता शेअर, आजही घसरला; आला ₹18 वर

गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ...! ₹393 वर होता शेअर, आजही घसरला; आला ₹18 वर

हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 26 टक्क्यांनी घसरला आहे. 17 ऑगस्ट 2018 रोजी हा शेअर 393 रुपयांवर होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:49 IST2025-01-07T18:48:49+5:302025-01-07T18:49:12+5:30

हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 26 टक्क्यांनी घसरला आहे. 17 ऑगस्ट 2018 रोजी हा शेअर 393 रुपयांवर होता.

yes bank share was at rs 393 fell again today came to rs 18-80 | गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ...! ₹393 वर होता शेअर, आजही घसरला; आला ₹18 वर

गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ...! ₹393 वर होता शेअर, आजही घसरला; आला ₹18 वर

शेअर बाजारात येस बँक लिमिटेडचा शेअर मंगळवारच्या व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होता. कंपनीचा शेअर 1% पेक्षा अधिक वाढून 19.11 रुपयांच्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचला होता. मात्र, ट्रेडिंगदरम्यान तो 1% पेक्षा अधिक घसरला आणि 18.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 26 टक्क्यांनी घसरला आहे. 17 ऑगस्ट 2018 रोजी हा शेअर 393 रुपयांवर होता.

असे आहेत डिटेल्स -
कंपनी 25 जानेवारी, 2025 रोजी आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल घोषित करणार आहे. बीएसई फायलिंगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'यस बँकेची बैठक 25 जानेवारी 2025 रोजी मुंबईत आयोजित केली जाणार आहे. यात इतर गोष्टींबरोबरच अन-ऑडिटेड वरही विचार आणि अप्रूव्हल होईल. 31 डिसेंबर, 2024 रोजी संपलेली तिमाही (Q3) आणि 9 महिन्यांसाठी बँकेचे स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले जातील.'

काउंटरने 5, 10, 20, 30, 50, 100, 150 आणि 200 दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरी (SMA) पेक्षा कमी व्यापार केला. काउंटरचा 14-दिवसीय सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक (RSI) 35.03 वर आला. 30 पेक्षा खालच्या पातळीला ओव्हरसोल्ड म्हणून परिभाषित करण्यात आले आहे. तर 70 पेक्षा वरील मूल्याला ओव्हरबॉट मानले जाते.

Web Title: yes bank share was at rs 393 fell again today came to rs 18-80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.