World Car Companies Ranking: भारत ऑटो क्षेत्रात सतत नवीन उंची गाठत आहे. याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की, जगातील 30 सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कार कंपन्यांची नावे देखील समाविष्ट आहेत. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. यात जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांची रँकिंग दाखवली आहे.
30 of the world’s richest car companies- happy to see a few Indian flags…. pic.twitter.com/VfSNzjvY1j
— Harsh Goenka (@hvgoenka) July 8, 2025
कोणत्या भारतीय कंपन्यांचा समावेश आहे?
हर्ष गोएंका यांनी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, 'ही जगातील 30 सर्वात श्रीमंत कार कंपन्यांची रँकिंग आहे. यात काही भारतीय कंपन्या पाहून आनंद झाला.' जगातील 30 सर्वात महागड्या कार कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी 14 व्या स्थानावर आहे. याशिवाय, महिंद्र अँड महिंद्र 15 व्या, तर टाटा मोटर्स 19 व्या स्थानावर आहे.
सर्वात महागड्या कार कंपन्या कोणत्या?
जगातील सर्वात महागडी कार कंपनी टेस्ला आहे, ज्याचे मार्केट कॅप 1.1 ट्रिलियन डॉलर्स आहे. टेस्लानंतर टोयोटा दुसऱ्या नंबरवर, तर शाओमी तिसऱ्या क्रमांकावर, बीवायडी चौथ्या क्रमांकावर, रोल्स-रॉइस पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय, फेरारी सहाव्या क्रमांकावर, ऑडी सातव्या क्रमांकावर, फोक्सवॅगन आठव्या क्रमांकावर आणि मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू यांचा समावेश आहे.
भारतीय कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सुझुकीचे मार्केट कॅप 46.1 अब्ज डॉलर्स, तर महिंद्रा अँड महिंद्राचे मार्केट कॅप 43.4 अब्ज डॉलर्स आहे. यानंतर, टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 31.8 अब्ज डॉलर्स आहे.