Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय आयटी इंजिनिअर्सची जागा AI घेणार? इन्फोसिस, टीसीएसला मोठा फटका; शेअर्स ५% पर्यंत घसरले

भारतीय आयटी इंजिनिअर्सची जागा AI घेणार? इन्फोसिस, टीसीएसला मोठा फटका; शेअर्स ५% पर्यंत घसरले

IT stocks: आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, निफ्टी आयटी इंडेक्स ४% पेक्षा जास्त घसरला आणि आज बाजारातील सर्वात मोठा क्षेत्रीय तोटा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:17 IST2026-02-12T12:15:23+5:302026-02-12T12:17:06+5:30

IT stocks: आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, निफ्टी आयटी इंडेक्स ४% पेक्षा जास्त घसरला आणि आज बाजारातील सर्वात मोठा क्षेत्रीय तोटा झाला.

Why IT Stocks are Falling Today Impact of US Jobs Report and AI Competition | भारतीय आयटी इंजिनिअर्सची जागा AI घेणार? इन्फोसिस, टीसीएसला मोठा फटका; शेअर्स ५% पर्यंत घसरले

भारतीय आयटी इंजिनिअर्सची जागा AI घेणार? इन्फोसिस, टीसीएसला मोठा फटका; शेअर्स ५% पर्यंत घसरले

IT stocks : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा सरस आलेला 'जॉब रिपोर्ट' आणि 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मुळे सॉफ्टवेअर सर्व्हिस क्षेत्राला निर्माण झालेला धोका, या दुहेरी संकटामुळे गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्समधून काढता पाय घेतला. परिणामी, निफ्टी IT इंडेक्स ४ टक्क्यांहून अधिक घसरून आजचा सर्वात मोठा 'सेक्टोरल लूझर' ठरला.

'एआय'ने वाढवली धास्ती
'एंथ्रोपिक' या एआय डेव्हलपर कंपनीने कायदेशीर, सेल्स, मार्केटिंग आणि डेटा अॅनॅलिसिसची कामे स्वयंचलित करणारे नवीन 'प्लग-इन्स' लाँच केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतीय आयटी कंपन्यांचा व्यवसाय प्रामुख्याने मानवी श्रमावर आधारित आहे. एआयमुळे कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. एआय सॉफ्टवेअर निर्माते पारंपारिक आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर आक्रमण करत असल्याने भविष्यातील नफ्यावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

कोण किती पडले?
गेल्या वर्षभरात (२०२५) १३ टक्क्यांनी घसरलेला आयटी इंडेक्स २०२६ मध्ये आतापर्यंत ११ टक्क्यांनी खाली आला आहे. आजच्या सत्रात
कोफोर्ज आणि इन्फोसिस : सुमारे ५ टक्क्यांची घसरण. इन्फोसिस गेल्या वर्षीच्या एप्रिलनंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
TCS, टेक महिंद्रा, LTI माइंडट्री : ४ टक्क्यांहून अधिक घसरण.
विप्रो आणि HCL टेक : ३ टक्क्यांहून अधिक घसरण.

अमेरिकेतील जॉब रिपोर्टचा दबाव
अमेरिकेत जानेवारी महिन्यात नोकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बेरोजगारीचा दर ४.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मजबूत लेबर मार्केटमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह 'व्याजदर कपात' लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीटवर मायक्रोसॉफ्ट (२.२%) आणि अल्फाबेट (२.४%) यांसारख्या कंपन्या घसरल्याने भारतीय बाजारातही त्याचे पडसाद उमटले.

वाचा - टेलिमार्केटिंग कॉल्स आणि चुकीचे प्रॉडक्ट ग्राहकांना विकल्यास भोवणार! RBI चे बँकांसाठी कडक नियम

तज्ज्ञांचे मत
आयटी शेअर्समधील आजची पडझड ही केवळ तात्कालिक प्रतिक्रिया नसून आयटी क्षेत्राला खऱ्या अर्थाने निर्माण झालेल्या धोक्याचे संकेत आहेत. एआय ऑटोमेशनमुळे भारतीय कंपन्यांच्या हेडकाउंटवर परिणाम होईल, ज्यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्रात अधिक घसरण दिसू शकते.

Web Title : एआई का खतरा: भारतीय आईटी कंपनियों को नुकसान, शेयर गिरे।

Web Summary : एआई स्वचालन के डर और मजबूत अमेरिकी नौकरी के आंकड़ों के कारण भारतीय आईटी शेयरों में गिरावट आई। इंफोसिस और टीसीएस में बड़ी गिरावट देखी गई, जो भविष्य की लाभप्रदता और कार्यबल में कमी के बारे में चिंताओं का संकेत देती है।

Web Title : AI threat: Indian IT firms face losses; shares decline.

Web Summary : Indian IT stocks plunged due to AI automation fears and strong US job data. Infosys and TCS saw significant drops, signaling concerns about future profitability and workforce reduction.