Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प आल्यानंतर जागतिक स्तरावर अनेक गणित बदलली आहेत. ट्रम्प आणि भारत यांचे अनोखे नाते आहे. कारण, ट्रम्प हे व्यावसायिक असून अगदी पुण्यातही त्यांची मालमत्ता आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात २ भारतीय पाहुण्यांनी विषेश लक्ष वेधलं. हे दोघेजण ट्रम्प यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे १३ वर्षांपासून व्यवसायिक संबंध आहेत.
ट्रिबेका डेव्हलपर्सचे मालक कल्पेश मेहता हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट कंपनी ट्रम्प टॉवरचे भागीदार आहेत. कल्पेश ट्रम्प टॉवरसह भारतात रिअल इस्टेटचा व्यवसाय करत आहे. दोघांमध्ये जवळपास १३ वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत.
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील २ पाहुण्यांची चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात जगभरातील दिग्गज सहभागी झाले होते. मात्र यात भारतातून अमेरिकेत आलेल्या २ पाहुण्यांबद्दल बरीच चर्चा झाली होती. हे दोन लोक कोणी राजकीय व्यक्ती नाहीत तर व्यावसायिक कल्पेश मेहता आणि पंकज बन्सल आहेत. दोघेही डोनाल्ड यांच्या खूप जवळचे आहेत. कारण दोघांचे ट्रम्प यांच्या भारतातील व्यवसायाशी संबंध आहेत.
कोण आहे कल्पेश मेहता?
कल्पेश मेहता हे मुंबईत राहणारे भारतीय व्यापारी आहेत. मेहता हे रिअल इस्टेट क्षेत्रातील एक मोठे नाव आहे, ते ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. मेहता डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतातील व्यवसायाची देखरेख करतात. भारतीय बाजारपेठेतील ट्रम्प टॉवर्ससाठी ते परवानाधारक भारतीय भागीदार आहे. याआधी त्यांनी हौसर, लेहमन ब्रदर्स, द कार्लाइल ग्रुप आणि स्टारवुड कॅपिटल ग्रुप यांसारख्या अनेक मोठ्या आणि नामांकित कंपन्यांसाठीही काम केले आहे.
१३ वर्षांपासून मैत्रिपूर्ण संबंध
मेहता यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत १३ वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. ट्रम्प रिअल इस्टेट ब्रँड भारतात आणण्यासाठी अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांसोबतची त्यांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. ज्यांनी भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये लक्झरीला प्रोत्साहन दिले आहे. ट्रिबेका डेव्हलपर्स हा भारतातील ट्रम्प टॉवर्स प्रकल्पांसाठी परवानाधारक भारतीय भागीदार आहे, ज्याने ट्रम्प ऑर्गनायझेशनसोबत १३ वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. या भागीदारीमुळे पुणे, गुरुग्राम आणि इतर शहरांमध्ये ट्रम्प टॉवर्ससह लक्झरी मालमत्तांचा विकास झाला आहे. कल्पेश मेहता यांचे डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे ट्रम्प कुटुंबाशी असलेले त्यांचे दीर्घकाळचे नाते आणखी घट्ट झाले आहे.