नफा घसरलेल्याचा तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतरही LG Electronics India च्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी कंपनीचे शेअर्स ४% नी वधारून ₹१,६९१ वर पोहोचले आहेत. एवढेच नाहीत तर ब्रोकरेज फर्मने ₹१,९२० चे लक्ष्य दिले आहे.
एलजीनेशेअर बाजारात लिस्टिंगनंतर नुकतेच आपले पहिले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. यामुळे कंपनीचे शेअर घसरण्याची शक्यता होती. परंतू, शेअर बाजारात ते उलट वाढले आहेत. मागील वर्षीच्या ₹५३६ कोटींच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा यंदा २७.३% नी घसरून ₹३८९ कोटी राहिला. तरीही, शेअर बाजारात या स्टॉकची मागणी कायम आहे.
'TINA' फॅक्टर म्हणजे काय?
स्टॉक वाढण्याचे मुख्य कारण बाजारातील 'TINA' (There Is No Alternative) फॅक्टर असल्याचे मानले जात आहे. एलजी ही कंपनी ग्राहक टिकाऊ वस्तू (Consumer Durables) क्षेत्रात कार्यरत आहे आणि होम अप्लायन्सेसची (टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी) विस्तृत श्रेणी सादर करणारी बाजारात सूचीबद्ध असलेली एकमेव मोठी कंपनी आहे. या कंपनीला स्पर्धकच नसल्याने गुंतवणूकदारांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी दुसरा पर्यायच नाहीय. यामुळे गुंतवणूकदार या शेअरमध्ये पैसा लावत आहेत.
जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली यांनी देखील LG Electronics च्या शेअर्सवर 'ओवरवेट' रेटिंगसह कव्हरेज सुरू केले आहे. जेपी मॉर्गनने शेअर्ससाठी ₹१,९२० चा उच्च लक्ष्य (Target Price) दिला आहे. तर मॉर्गन स्टॅनलीने ₹१,८६४ चा लक्ष्य दर निश्चित केला आहे.
