JioHotstar Free IPL Cricket Plan: आयपीएल हे क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. २२ मार्च पासून आयपीएलच्या २०२५ च्या हंगामाला सुरुवात होणारे.
दोन महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेत सर्व क्रिकेट संघ आमनेसामने येणारेत. आयपीएल पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीनं खास ऑफर आणली आहे. विद्यमान आणि नवीन जिओ सिम ग्राहकांना केवळ २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांच्या प्लॅनवर ९० दिवस मोफत जिओ हॉटस्टार आणि ५० दिवस मोफत JioFiber/AirFiber सह अनेक फायदे मिळतील.
मोफत आयपीएलचा आनंद
जर तुम्ही जिओ युजर असाल आणि आयपीएलचा मोफत आनंद घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ही ऑफर २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या रिचार्जवर मिळणार असल्यानं जिओनं म्हटलंय. जर तुम्हाला नवीन जिओ सिम घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी २९९ रुपयांचं रिचार्ज करावं लागेल, तरच तुम्ही मोफत आयपीएल पाहू शकाल. तर हाच नियम जुन्या जिओ युजर्सनाही लागू होणार आहे. म्हणजेच जर तुम्हाला आयपीएल पाहायचं असेल तर तुम्हाला २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावं लागेल.
४के क्वालिटीत सामने पाहता येणार
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना १७ मार्च ते ३१ मार्च २०२५ दरम्यान जिओ सिम खरेदी करावं लागेल किंवा २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेनं आपला विद्यमान जिओ नंबर रिचार्ज करावा लागेल. रिलायन्स जिओच्या म्हणण्यानुसार, अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना ९० दिवसांचं मोफत जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल. युजर्स ४के क्वालिटीपर्यंत ऑनलाइन सामने पाहू शकतील.
याव्यतिरिक्त, रिलायन्स जिओ ५० दिवसांसाठी जिओ फायबर किंवा जिओ एअरफायबरचं मोफत ट्रायल कनेक्शन देखील देत आहे, ज्यात ८०० हून अधिक टीव्ही चॅनेल, ११ पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स आणि अमर्यादित वाय-फाय अॅक्सेसचा समावेश आहे.
आणखी काही स्वस्त डेटा प्लॅन
२५ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो.
६१ रुपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी डेटा मिळतो आणि त्याची वैधता तुमच्या सध्याच्या प्लॅनइतकीच आहे.
१२१ रुपयांचा प्लॅन : यात १२ जीबी डेटा मिळतो आणि तुमच्या सध्याच्या प्लॅन इतकी त्याची वैधता आहे.
कुठून खरेदी कराल?
जिओचे हे प्लॅन तुम्ही मायजिओ अॅप, जिओची अधिकृत वेबसाइट (www.jio.com) किंवा पेटीएम, गुगल पे, फोनपे सारख्या अॅप्सवरून रिचार्ज करू शकता.