Tata Nexon EV EMI: भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये अनेक कार ऑफर करते. टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात टाटा नेक्सॉन ईव्ही ही अत्यंत महत्त्वाची कार आहे. आता या कारनं विक्रीच्या बाबतीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीनं नुकताच १ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडलाय. जर तुम्ही टाटा नेक्सॉन ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या ईएमआय (EMI) विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
टाटा नेक्सॉन ईव्हीची किंमत
टाटा नेक्सॉन ईव्हीच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १२.४९ लाख रुपये आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटची ऑन-रोड किंमत १८.६० लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही टाटा नेक्सॉन ईव्हीचं बेस व्हेरियंट दिल्लीत खरेदी केलं, तर तुम्हाला १.३३ लाख रुपये रजिस्ट्रेशन आणि ६०,००० रुपये विम्यासाठी द्यावे लागतील. इतर सर्व शुल्क मिळून टाटा नेक्सॉन ईव्हीचे बेस व्हेरियंट तुम्हाला ऑन-रोड एकूण १४.५६ लाख रुपयांना पडेल.
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
डाउन पेमेंट आणि कर्ज
जर तुम्हाला टाटा नेक्सॉन ईव्हीचे बेस व्हेरियंट हप्त्यावर म्हणजेच ईएमआयवर खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला ३ लाख रुपयांपर्यंत डाउन पेमेंट करावे लागेल. ३ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, उर्वरित ११.५६ लाख रुपयांच्या रकमेसाठी तुम्हाला बँकेकडून फायनान्स घ्यावं लागेल.
मासिक ईएमआयचं गणित
बँकेकडून ११.५६ लाख रुपयांचे कर्ज ७ वर्षांच्या कालावधीसाठी घेतलं आणि त्यावर ९ टक्के व्याजाचा दर आकारला गेला, तर तुम्हाला दरमहा १८,५९९ रुपये ईएमआई म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे, ७ वर्षांच्या कालावधीत तुम्ही बँकेला एकूण १५.६२ लाख रुपये परत कराल. यामध्ये ४.०६ लाख रुपये केवळ व्याजाची रक्कम म्हणून समाविष्ट असतील.
