Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला

आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला

Waaree energies share decline: आयकर अधिकाऱ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या कार्यालयांची आणि आस्थापनांची झडती घेतली. कंपनीनंच यासंदर्भातील माहिती दिली. परंतु यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:01 IST2025-11-19T16:01:01+5:302025-11-19T16:01:01+5:30

Waaree energies share decline: आयकर अधिकाऱ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या कार्यालयांची आणि आस्थापनांची झडती घेतली. कंपनीनंच यासंदर्भातील माहिती दिली. परंतु यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

Waaree energies giant company on the radar of income tax officials Investors queue up to sell stock share hits | आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला

आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला

Waaree energies share decline: आयकर अधिकाऱ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील कंपनी वारी एनर्जीजच्या कार्यालयांची आणि आस्थापनांची झडती घेतली. कंपनीनंच यासंदर्भातील माहिती दिली. या बातमीच्या दरम्यान, बुधवारी वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, शेअर ६% नं घसरला आणि ३०८५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. सप्टेंबर २०२५ मध्ये हा शेअर ३८६४.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. हा स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. तर, शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी १,८०८.६५ रुपये आहे.

कंपनीनं काय म्हटलं?

"आयकर विभागातील काही अधिकाऱ्यांनी १९६१ च्या आयकर कायदा अंतर्गत चौकशी करण्यासाठी कंपनीच्या भारतातील काही कार्यालयांना आणि आस्थापनांना भेट दिली," असं वारी एनर्जीजकडून सांगण्यात आलं. तसंच कार्यवाही सुरू असून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं, सौरऊर्जा आयातीवरील कथित कर चुकवेगिरीच्या आरोपाखाली कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीत अमेरिकन सरकारला सहकार्य करत राहील असं वारी एनर्जीजने सप्टेंबरमध्ये म्हटलं होतं. कंपनीची उपकंपनी, 'वारी सोलर अमेरिकाज'ची टेक्सासमध्ये १.६ गिगावॅट मॉड्यूल उत्पादन सुविधा आहे, जी ३.२ गिगावॅटपर्यंत वाढवली जात आहे.

आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा

कंपनीचे तिमाही निकाल

वारी एनर्जीज लिमिटेडचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दुपटीनं वाढून ₹८७१.२१ कोटी झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीनं ₹३७५.६६ कोटी निव्वळ नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर २०२५ या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ₹६,२२६.५४ कोटी झालं, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹३,६६३.४७ कोटी होतं. या कालावधीत खर्चही वाढून ₹४,९९५.०८ कोटी झाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ₹३,१६४.६३ कोटी होता.

दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळानं २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ₹२ चा अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख २४ ऑक्टोबर आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : आयकर विभाग की छापेमारी के बाद वारी एनर्जीज के शेयर में गिरावट

Web Summary : आयकर विभाग के अधिकारियों द्वारा वारी एनर्जीज के कार्यालयों की तलाशी के बाद कंपनी के शेयर में गिरावट आई। कंपनी ने जांच की पुष्टि की और पूरा सहयोग कर रही है। मजबूत तिमाही मुनाफे और अंतरिम लाभांश के बावजूद, स्टॉक 6% गिरकर ₹3085 पर आ गया।

Web Title : Income Tax Raid Hits Waaree Energies; Stock Plummets Amid Investor Concerns.

Web Summary : Waaree Energies shares fell after income tax officials searched company offices. The company confirmed the investigation and is cooperating fully. Despite strong Q2 profits and an interim dividend, the stock declined by 6%, reaching ₹3085.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.