Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी

इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी

Share Market High: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या बातमीनं जागतिक बाजारपेठेसह शेअर बाजारातही मोठा उत्साह निर्माण केला आहे. या सकारात्मक बातमीचा परिणाम बुधवारी बाजार उघडताच दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:49 IST2026-04-08T09:46:49+5:302026-04-08T09:49:31+5:30

Share Market High: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या बातमीनं जागतिक बाजारपेठेसह शेअर बाजारातही मोठा उत्साह निर्माण केला आहे. या सकारात्मक बातमीचा परिणाम बुधवारी बाजार उघडताच दिसून आला.

us israel iran ceasefire donald trump gift nifty high indian market Sensex rises by 2600 points Nifty gains 700 points crude price down | इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी

इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी

Share Market High: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या बातमीनं जागतिक बाजारपेठेसह शेअर बाजारातही मोठा उत्साह निर्माण केला आहे. या सकारात्मक बातमीचा परिणाम बुधवारी बाजार उघडताच दिसून आला आणि भारतीय शेअर बाजारात चौफेर खरेदी पाहायला मिळाली. गेल्या अनेक आठवड्यांपासून दबावाखाली असलेला बाजार अचानक सुसाट सुटला असून, सेन्सेक्स सुमारे २६०० अंकांच्या प्रचंड उसळीसह उघडला, तर निफ्टीमध्येही ७०० हून अधिक अंकांची वाढ झाली. जागतिक तणाव कमी झाल्याचे संकेत मिळताच गुंतवणूकदारांचा विश्वास परतला आणि जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराचं वातावरण पूर्णपणे बदललं.

बाजाराची सुरुवातीची स्थिती

बुधवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये खरेदीची चढाओढ लागली. सेन्सेक्स २,६९६ अंकांच्या जोरदार वाढीसह ७७,३१२ च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील मागे राहिला नाही आणि ७६७ अंकांची तेजी दाखवत २३,८९० च्या पार गेला. बाजार उघडताच सुमारे २,५३४ शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर केवळ १६६ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर

'या' शेअर्सनी मारली बाजी

आजच्या या तेजीचा सर्वाधिक फायदा तेल किंवा पायाभूत सुविधांशी संबंधित कंपन्यांना झाला आहे. कच्चं तेल स्वस्त झाल्याच्या वृत्तामुळे 'इंटरग्लोब एव्हिएशन'च्या (Indigo) शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. याशिवाय L&T, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस हे शेअर्स निफ्टीच्या 'टॉप गेनर्स'मध्ये सामील झाले. दुसरीकडे, तेलाच्या किमती घसरल्यामुळे ओएनजीसी आणि कोल इंडिया यांसारख्या शेअर्सवर दबाव दिसून आला आणि ते रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.

बाजारात इतकी मोठी तेजी का आली?

या महा-तेजीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक स्तरावर मिळालेला दिलासा. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती २० टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश तेल आयात करत असल्यानं, स्वस्त तेल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'बूस्टर डोस' ठरत आहे. यामुळे महागाई कमी होण्याची आणि कंपन्यांचा खर्च कमी होण्याची आशा निर्माण झाली असून गुंतवणूकदारांचा विश्वास परतलाय.

तज्ज्ञांच्या मते, जर ही शस्त्रसंधी स्थिर राहिली आणि इराणसोबतची चर्चा यशस्वी झाली, तर भारतीय बाजार लवकरच आपले जुने 'लाईफ-टाइम हाय' रेकॉर्ड्स मोडीत काढू शकतो. सध्या बँकिंगपासून आयटी क्षेत्रापर्यंत सर्वच शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत.

Web Title : ईरान-अमेरिका युद्धविराम से शेयर बाजार में उछाल, सेंसेक्स, निफ्टी में तेजी

Web Summary : ईरान-अमेरिका युद्धविराम से बाजार में तेजी आई। सेंसेक्स 2600 अंक, निफ्टी 700 अंक ऊपर। तेल और बुनियादी ढांचा शेयरों में उछाल। वैश्विक तनाव कम होने से निवेशकों का विश्वास लौटा।

Web Title : Market Soars as Iran-US Truce Sparks Sensex, Nifty Rally

Web Summary : Iran-US truce triggered a massive market rally. Sensex jumped 2600 points, Nifty 700. Oil & infra stocks surged. Investors regained confidence amid easing global tensions.