Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक बदलताच 'ही' माहिती अपडेट करा, अन्यथा PF चे पैसे काढता येणार नाहीत...

बँक बदलताच 'ही' माहिती अपडेट करा, अन्यथा PF चे पैसे काढता येणार नाहीत...

प्रत्येक पगारदार व्यक्तीने ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:14 IST2026-02-17T18:13:15+5:302026-02-17T18:14:10+5:30

प्रत्येक पगारदार व्यक्तीने ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Update this information as soon as you change bank, otherwise you will not be able to withdraw PF money | बँक बदलताच 'ही' माहिती अपडेट करा, अन्यथा PF चे पैसे काढता येणार नाहीत...

बँक बदलताच 'ही' माहिती अपडेट करा, अन्यथा PF चे पैसे काढता येणार नाहीत...

नोकरी बदलल्यानंतर अनेक पगारदार कर्मचारी आपले सॅलरी बँक खाते बदलतात, मात्र एक महत्त्वाची बाब दुर्लक्षित राहते, ती म्हणजे EPFO (कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटना) मधील बँक खाते. हे खाते EPFO पोर्टलवर जाऊन स्वतः अपडेट करावे लागते. जुने सॅलरी खाते बंद किंवा निष्क्रिय झाले असल्यास, PF मधून पैसे काढताना मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

जुने खाते बंद असेल तर काय अडचण येते?

EPFO तुमच्या UAN शी जोडलेल्या बँक खात्यातच PF ची रक्कम पाठवते. जर हे खाते बंद किंवा इनॅक्टिव्ह असेल, तर क्लेम परत येऊ शकतो. अनेकांना ही चूक तेव्हाच लक्षात येते, जेव्हा ते PF काढण्याचा प्रयत्न करतात.

काहीही करण्याआधी हे तपासा

EPFO मेंबर ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करा

तुमचा UAN सध्या कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे, ते तपासा

आधार व्हेरिफिकेशन पूर्ण आहे का, हे तपासणे अत्यावश्यक आहे

आधार, पॅन आणि बँक तपशीलांमध्ये नावाची स्पेलिंगसुद्धा जुळली पाहिजे

अगदी छोटी चूक असली तरी अपडेट नाकारले जाऊ शकते

जर कोणतीही माहिती जुळत नसेल, तर आधी ती दुरुस्त करा, अन्यथा प्रक्रिया पुढे जाणार नाही.

EPFO मध्ये बँक खाते कसे बदलावे?

EPFO पोर्टलवर लॉग इन करा

‘Manage’ सेक्शनमध्ये जाऊन ‘KYC’ वर क्लिक करा

तुमचे सध्याचे बँक तपशील दिसतील

नवीन बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड काळजीपूर्वक भरा

आवश्यक असल्यास रद्द केलेल्या चेकचा (Cancelled Cheque) स्पष्ट फोटो अपलोड करा

सबमिट केल्यानंतर ही विनंती थेट मंजूर होत नाही

महत्वाचे...

ही विनंती तुमच्या नियोक्त्याकडे (Employer/HR) मंजुरीसाठी जाते. HR ने मंजुरी दिल्याशिवाय बदल लागू होत नाही. जर विनंती अडकली असेल, तर वाट पाहत बसण्याऐवजी थेट HR किंवा पेरोल विभागाशी संपर्क साधा.

हे अपडेट का इतके महत्त्वाचे आहे?

चुकीचे बँक तपशील असतील तर EPFO पेमेंट प्रक्रिया करत नाही

PF क्लेम रिजेक्ट होऊ शकतो

पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया करावी लागते

विशेषतः नोकरी सोडल्यानंतर, किंवा PF अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करताना, ही अडचण मानसिक ताण वाढवू शकते. वेळ असताना खाते अपडेट करणे अधिक सोपे आणि सुरक्षित ठरते.

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

एका UAN अंतर्गत एकाच वेळी फक्त एक बँक खाते सक्रिय असू शकते. नोकरी बदलली तरी UAN बदलत नाही, तो संपूर्ण करिअरभर एकच राहतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सॅलरी बँक खाते बदलेल, तेव्हा EPFO अपडेट तुमच्या चेकलिस्टमध्ये नक्की ठेवा. पाच मिनिटांचे काम पुढे आठवड्यांची धावपळ वाचवते.
 

Web Title : PF निकालने में परेशानी से बचने के लिए EPFO में बैंक डिटेल अपडेट करें

Web Summary : नौकरी बदलने पर EPFO पोर्टल पर बैंक डिटेल अपडेट करें। UAN से जुड़े निष्क्रिय खाते PF क्लेम खारिज करवा सकते हैं। KYC अपडेट करें और नियोक्ता से मंज़ूरी लें। UAN से लिंक बैंक खाता सक्रिय रखें।

Web Title : Update Bank Details in EPFO to Avoid PF Withdrawal Issues

Web Summary : Changing jobs? Update your bank details on the EPFO portal. Inactive bank accounts linked to UAN cause PF claim rejections. Verify details, update KYC, and get employer approval to ensure smooth withdrawals. Keep your UAN-linked bank account active.