Oil & Gas Sector : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगासमोर तेल आणि गॅसचे संकट उभे राहिले आहे. भारतात तर घरगुती गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग सारखा नियम लागू केला आहे. अशा परिस्थितीत जागतिक ऊर्जा बाजारपेठेत आजवर कोणाचे वर्चस्व आहे, हे स्पष्ट करणारी एक रंजक माहिती समोर आली आहे. बाजार मूल्यानुसार जगातील १० सर्वात मोठ्या तेल आणि गॅस कंपन्यांच्या यादीत सौदी अरेबियाच्या 'अरामको'ने अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारताच्या तीन कंपन्यांनी जगातील १०० मोठ्या कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवून देशाची ऊर्जा ताकद सिद्ध केली आहे.
'अरामको'चे जागतिक वर्चस्व
सौदी अरेबियाची 'सऊदी अरामको' ही कंपनी जगातील सर्वात मोठी तेल आणि गॅस कंपनी ठरली आहे. तिचे बाजार मूल्य तब्बल १६०.६६ लाख कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या यादीत अमेरिकन कंपन्यांचा दबदबा असून, पहिल्या १० मध्ये अमेरिकेच्या ३ कंपन्यांचा समावेश आहे.
जगातील 'टॉप १०' तेल-गॅस कंपन्या (मार्केट कॅपनुसार)
| क्र. | कंपनीचे नाव | बाजार मूल्य (लाख कोटी रु.) | देश |
| १ | सऊदी अरामको | १६०.६६ | सौदी अरब |
| २ | एक्सॉन मोबिल | ५७.६४ | अमेरिका |
| ३ | शेवरॉन | ३४.८३ | अमेरिका |
| ४ | पेट्रोचाइना | २९.५८ | चीन |
| ५ | शेल | २२.१८ | यूके |
| ६ | सीएनओओसी | १५.७२ | चीन |
| ७ | टोटलएनर्जीज | १५.६७ | फ्रान्स |
| ८ | कोनोकोफिलिप्स | १३.१५ | अमेरिका |
| ९ | एनब्रिज | १०.८२ | कॅनडा |
| १० | पेट्रोब्रास | १०.७६ | ब्राझील |
टीप: आकडेवारी अंदाजे आणि १० मार्च २०२६ च्या बाजार मूल्यानुसार)
जागतिक यादीत भारताचा शिरकाव
जागतिक पातळीवरील १०० मोठ्या तेल-गॅस कंपन्यांच्या यादीत भारताच्या तीन कंपन्यांनी मानाचे स्थान मिळवले आहे.
- ओएनजीसी : ४९ व्या क्रमांकावर असून तिचे मूल्य ३.३८ लाख कोटी रुपये आहे.
- इंडियन ऑईल : ६३ व्या क्रमांकावर असून तिचे मूल्य २.२७ लाख कोटी रुपये आहे.
- ऑईल इंडिया : ८३ व्या क्रमांकावर असून तिचे मूल्य १.४० लाख कोटी रुपये आहे.
वाचा - हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले
