Lokmat Money > बिझनेस न्यूज > Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा

Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा

Trump Tariff News Apple Update: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:38 IST2025-08-07T10:35:51+5:302025-08-07T10:38:53+5:30

Trump Tariff News Apple Update: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Tim Cook bows to Donald Trump s tariff threats Apple s big announcement investment of rs 877732 crore in us | Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा

Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा

Trump Tariff News Apple Update: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर आणखी दुय्यम कर लावणार असल्याचंही म्हटलंय. अमेरिकेने अतिरिक्त २५% कर लादण्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं 'आम्ही जे काही पाऊल उचलतो ते १.४ अब्ज भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षेचा विचार करून उचललं जातं,' असं म्हणत स्पष्ट शब्दात अमेरिकेला खडसावलं. सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की, भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत आहे आणि ते पूर्णपणे राष्ट्रीय हितासाठी केलं जातंय. MEA ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला दुर्देवी, अन्याय करणारा आणि अस्वीकार्य म्हटलंय. 'अमेरिका इतर अनेक देशांनी केलेल्या कृतींसाठी भारताला लक्ष्य करत आहे, हे दुर्देवी आहे,' असंही भारतानं म्हटलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात येणाऱ्या चिप्सवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्याचं जाहीर केल्यानंतर, अ‍ॅपलने बुधवारी अमेरिकेत आपले कामकाज वाढवण्यासाठी आणखी १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. अ‍ॅपलची ही गुंतवणूक अशा वेळी झाली आहे जेव्हा या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं या वर्षाच्या सुरुवातीला आपला देशांतर्गत व्यवसाय वाढवण्यासाठी ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं, कारण ट्रम्प यांनी अमेरिकन व्यापारी भागीदारांवर लादलेल्या शुल्कामुळे अ‍ॅपलला अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं आहे.

लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी

या नवीन प्रयत्नात अ‍ॅपलचे त्याच्या प्रमुख देशांतर्गत पुरवठादारांशी संबंध वाढवणं समाविष्ट आहे, कारण ट्रम्प अ‍ॅपल आणि इतर टेक दिग्गजांना अमेरिकेत उत्पादन हलविण्यासाठी दबाव आणत आहेत. गुंतवणुकीचा आनंद साजरा करण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या कार्यक्रमात, ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित सेमीकंडक्टर आणि चिप्सवर १००% शुल्क लावण्याची धमकी देऊन आपली शुल्क धोरण आणखी मजबूत केलं. परंतु त्यांनी सांगितलं की अमेरिकेत उत्पादन करण्यास वचनबद्ध असलेल्या कंपन्यांवर कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही. चिपवरील शुल्क औपचारिकपणे कधी जाहीर केलं जाईल किंवा ते कधी लागू होईल हे त्यांनी सांगितलं नाही.

कम्प्युटर चिप्सवर १००% टॅरिफ

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कम्प्युटर चिप्सवर १०० टक्के कर लादतील असल्याचं सांगितलं. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, घरगुती उपकरणे आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. "आम्ही चिप्स आणि सेमीकंडक्टरवर जवळजवळ १०० टक्के कर लादू, परंतु जर तुम्ही अमेरिकेत उत्पादन करत असाल तर कोणतेही शुल्क लागणार नाही," असं ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान सांगितलं.

कोणावर किती टॅरिफ?

अमेरिकेने ज्या देशांवर आयात शुल्क लादलं आहे, त्यात भारत आणि ब्राझील यांच्यावर सर्वाधिक शुल्क आहे. भारत आणि ब्राझील हे ५० टक्के आयात शुल्क असलेल्या देशांच्या श्रेणीत आहेत. अमेरिकेनं म्यानमारवर ४० टक्के, थायलंड आणि कंबोडियावर ३६ टक्के, बांगलादेशवर ३५ टक्के, इंडोनेशियावर ३२ टक्के, चीन आणि श्रीलंकेवर ३० टक्के, मलेशियावर २५ टक्के, फिलीपिन्स आणि व्हिएतनामवर २० टक्के आयात शुल्क लादलंय.

Web Title: Tim Cook bows to Donald Trump s tariff threats Apple s big announcement investment of rs 877732 crore in us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.