मल्टीबॅगर स्टॉक अशोक बिल्डकॉम लिमिटेडला (Ashoka Buildcon Ltd) एक मोठी ऑर्डर मिळीली आहे. कंपनीला 499.95 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. कंपनीला हे काम नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, जयपूरकडून मिळाले आहे. कंपनीने एक्सचेंजला यासंदर्भात माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, शुक्रवारी अशोक बिल्डकॉमच्या शेअरची किंमत 0.55 टक्क्यांनी घसरून बीएसईवर 182.30 रुपयांवर बंद झाली.
कंपनीला इलेक्ट्रिक ट्रॅक सिस्टिम अपग्रेड करण्याचे काम मिळाले आहे. यात डिझाइन, सप्लाय, टेस्टिंग, कमिशनिंगचे काम आहे. सध्यस्थितीत 1x25 किलोवॅटचे सिस्टिम आहे. जे अपग्रेड करून 2x25 kV करायचे आहे. महत्वाचे म्हणजे, अशोक बिल्डकॉमला 24 महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती -
याच महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या तिमाही निकालाची घोषणा केली होती. या क्वार्टर रिझल्टमध्ये कंपनीने महिती दिली होती की, त्यांचा नेट प्रॉफीट 217.30 कोटी रुपये राहिला. वार्षिक आधारावर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 44.60 टक्क्यांची वाढ झाली होती. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 150.30 कोटी रुपये एवढा होता.
अशोक बिल्डकॉमचा रेव्हेन्यू 23.50 टक्क्यांच्या घसरणीनंतर, 1887 कोटी रुपये एवढा होता. या दरम्यान EBITDA 599 कोटी रुपयांवर स्थिर राहिला...