DreamFolks Services Share: एअरपोर्ट सर्व्हिस अॅग्रीगेटर ड्रीमफोक्स सर्व्हिसेसनं देशांतर्गत विमानतळ लाउंज व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय तात्काळ प्रभावानं लागू केला जाणार आहे. या निर्णयानंतर, कंपनीचे शेअर्स बुधवार, १७ सप्टेंबर रोजी ५% घसरून ₹१३१.०७ वर बंद झाले. ग्राहकांसाठी देशांतर्गत लाउंज एन्ट्री बंद करण्यात आली आहे, परंतु इतर देशांतर्गत सेवा आणि आंतरराष्ट्रीय लाउंज ऑपरेशन्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असं कंपनीनं म्हटलंय.
कंपनीनं काय म्हटलं?
देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेश आता त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध राहणार नसल्याचं कंपनीनं म्हटलंय. या निर्णयाचा कंपनीच्या व्यवसायावर लक्षणीय परिणाम होईल असंही त्यात म्हटलंय. दरम्यान, कंपनीनं स्पष्ट केलंय की तिच्या इतर देशांतर्गत सेवा आणि आंतरराष्ट्रीय लाउंज व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. "आम्ही सांगू इच्छितो की आमच्या क्लायंटसोबतचे करार सक्रिय राहतील आणि आम्ही पर्यायी कस्टमर व्हॅल्यू प्रपोझिशनवर चर्चा करत आहोत," असं कंपनीनं एका निवेदनाद्वारे म्हटलंय.
आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
तपशील काय आहेत?
ड्रीमफोक्स सर्व्हिसेसच्या अडचणी वाढत आहेत. ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसनं (टीएफएस) त्यांचा करार संपवल्यानंतर काही दिवसांतच कंपनीनं देशांतर्गत विमानतळ लाउंज व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रीमफोक्सने बँका आणि नेटवर्क कंपन्यांना लाउंज प्रवेश प्रदान करणारे अॅग्रीगेटर म्हणून काम केले. २९ ऑगस्ट रोजी अदानी डिजिटल, सेमोलिना किचन आणि एन्कॅल्म हॉस्पिटॅलिटीनं त्यांच्या काही सेवा बंद करण्याची घोषणा केली.
अलिकडच्या मुलाखतीत, ड्रीमफोक्सचे सीएमडी, लिबरेथा पीटर कल्लट यांनी सांगितल की तीव्र स्पर्धेमुळे कंपनीच्या क्लायंटवर विद्यमान करार सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यांनी असंही उघड केले की कंपनीला अप्रत्यक्ष अधिग्रहणाच्या ऑफर मिळाल्या आहेत. त्यांनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही, परंतु विमानतळ ऑपरेटर कंपनीच्या क्लायंटवर दबाव आणत असल्याचा आरोप केला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)