Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव तेजीत

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव तेजीत

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांकडून मागणी वाढल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावाने सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदली

By admin | Updated: June 13, 2014 04:21 IST2014-06-13T04:21:53+5:302014-06-13T04:21:53+5:30

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांकडून मागणी वाढल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावाने सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदली

On the third day, gold prices rose sharply | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव तेजीत

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव तेजीत

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांकडून मागणी वाढल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावाने सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदली. सोन्याचा भाव १० रुपयांनी वाढून २७,२४० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दुसरीकडे चांगली मागणी न मिळाल्याने चांदीचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन ४१,२०० रुपये प्रतिकिलो
राहिला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते आणि किरकोळ ग्राहकांकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात तेजी नोंदली गेली. याचा बाजार धारणेवर परिणाम झाला.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव १२६१.१२ डॉलर प्रतिऔंससह दोन आठवड्यांचा उच्चांकी पातळीवर गेला. याच पातळीवर मोठी मागणी झाल्याने स्थानिक बाजार धारणेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. दिल्ली बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव १० रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे २७,२४० आणि २७,०४० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,४०० रुपयांवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: On the third day, gold prices rose sharply