Gold Rate in Pakistan: धनत्रयोदशीचा मुहूर्त येण्यापूर्वीच भारतात सोन्याच्या दरांनी मोठी मुसंडी मारली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांत झालेली ही मोठी वाढ असून, पाकिस्तानातही सोन्याचे भाव अक्षरशः गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानात आज सोन्याचे दर प्रति तोळा ६९०० रुपयांनी म्हणजे जवळपास ७ हजार रुपयांनी वाढले आहेत. पाकिस्तानात १२ ग्रॅमचा एक तोळा होतो. एक तोळा सोने घेण्यासाठी ४ लाख ४२ हजार ८९६ रुपये मोजावे लागत आहेत.
जगभरात निर्माण झालेले अशांततेचं वातावरण आणि बाजारातील अस्थिरतेचा परिणामामुळे सोन्याच्या दर वेगाने वाढताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला असून, पाकिस्तानात सोने खरेदी सामान्यांना अशक्य झाली आहे.
गुड रिर्टन्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ३६ हजार ९०८ इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम ३३ हजार ८३२ रुपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याचा भावही पाकिस्तानात भारतापेक्षा खूपच जास्त आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम २७ हजार ६८१ रुपयांवर पोहोचली आहे.
पाकिस्तानात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ३ लाख ६९ हजार ८४ रुपयांवर पोहोचला आहे. तर ८ ग्रॅम सोने घेण्यासाठी २ लाख ९५ हजार २६७ रुपये लागत आहेत.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ३ लाख ३८ हजार ३२७, रुपये ८ ग्रॅम सोन्याची किंमत २ लाख ७० हजार ६६१ रुपये आहे.
पाकिस्तानात १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत २ लाख ७६ हजार ८१३ रुपये आहे. म्हणजे भारतात २४ कॅरेट एक तोळा सोन्याच्या किंमतीत पाकिस्तानात १८ कॅरेटचे पाच ग्रॅम सोनंच खरेदी केलं जाऊ शकतं.