lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुहूर्त ठरला! एअर इंडिया या आठवड्यात टाटांकडे

मुहूर्त ठरला! एअर इंडिया या आठवड्यात टाटांकडे

एअर इंडियासोबतच, तिची परवडणारी एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसचीही हिस्सेदारी विकली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:39 AM2022-01-25T05:39:39+5:302022-01-25T05:40:13+5:30

एअर इंडियासोबतच, तिची परवडणारी एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसचीही हिस्सेदारी विकली जाणार आहे.

The moment has come! Air India to Tata this week | मुहूर्त ठरला! एअर इंडिया या आठवड्यात टाटांकडे

मुहूर्त ठरला! एअर इंडिया या आठवड्यात टाटांकडे

नवी दिल्ली : हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया या आठवड्याच्या अखेरीस टाटा समूहाकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. सरकारने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला १८,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात एअर इंडियाच्या विक्रीसाठी मंजुरी दिली आहे.

एअर इंडियासोबतच, तिची परवडणारी एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसचीही हिस्सेदारी विकली जाणार आहे. याचसोबत त्यांची देखभाल कंपनी एआयएसएटीएसची ५० टक्के हिस्सेदारी टाटा समूहाला दिली जाणार आहे. याबाबतची हस्तांतरणाची औपचारिकता डिसेंबरअखेर पूर्ण होईल असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यास एक महिना विलंब झाला. पुढील काही दिवसांत या कराराची उर्वरित औपचारिकता पूर्ण होण्याची अपेक्षा असून, या आठवड्याच्या अखेरीस विमान कंपनी टाटा समूहाकडे सोपविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

६१ हजार ५६२ कोटी रुपयांची थकबाकी
सरकारने २५ ऑक्टोबरला १८ हजार कोटी रुपयांमध्ये एअर इंडियाची विक्री टाटा सन्सकडे देण्यासाठी खरेदी व्यवहार केला. या व्यवहारामध्ये २,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. एअर इंडिया २००७-०८ मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन केल्यापासू्न सतत तोट्यात होती. ३१ ऑगस्टपर्यंत कंपनीवर एकूण ६१ हजार ५६२ कोटी रुपयांची थकबाकी होती.

Web Title: The moment has come! Air India to Tata this week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.