Moeny Trape : सध्याच्या काळात पैशाशिवाय तुमचं पानही हलत नाही. त्यामुळे प्रत्येकजण पैशाच्या मागे धावताना पाहायला मिळत आहे. याच धावपळीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो 'किती कमवावे म्हणजे ते पुरेसे होईल?' चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांनी याच ज्वलंत प्रश्नावर आधारित 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट टाकली लिहिली आहे. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, पैशांची हाव कधीही का संपत नाही आणि या समस्येचे मूळ आपल्या विचारांमध्ये कसे दडलेले आहे.
पैसे आणि सुखाचे गणित
नितीन कौशिक यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, वर्षाला ४० ते ५० लाख रुपये कमावणारे लोकही अनेकदा तणावात असतात. सगळ्यांना वाटते की, जर वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपये झाले, तर आयुष्य आरामात जगता येईल. पण जेव्हा तुम्ही १ कोटी कमवायला लागता, तेव्हा तुमचे लक्ष्य हळूच २ कोटींवर सरकते. तुम्हाला वाटेल हा काय चमत्कार आहे? पण ही कोणतीही जादू नाही, तर आपल्या विचारांचा फास आहे. फक्त पैसे कमावण्यापेक्षा, आपण आपल्या आनंदाचे मापन कसे करतो, हे जास्त महत्त्वाचे आहे.
'लाइफस्टाइल क्रिप' म्हणजे काय?
नितीन कौशिक यांच्या मते, 'पुरेसे असणे' हा कोणताही आकडा नाही. हे एक संतुलन आहे, जिथे जगण्याची पद्धत, मनाची शांती आणि पैशांचा प्रवाह हे सर्व एकत्र जुळतात. खरे आर्थिक स्वातंत्र्य तेव्हा मिळते, जेव्हा पैसा तुमच्यावर राज्य करणे थांबवतो आणि तुमच्यासाठी काम करू लागतो. लाइफस्टाइल क्रिप याचा अर्थ, तुमची कमाई वाढते, पण त्याच वेळी तुमचा खर्चही दुप्पट होतो. हीच 'लाइफस्टाइल क्रिप' आहे. नवीन गाडी, मोठे घर, महागडे कपडे—ही खर्च करण्याची सवय लागली की, तुमचे आर्थिक लक्ष्य नेहमी तुमच्यापासून दूर पळत राहते.
पैसा ताण नाही, तुमचा आधार बनावा
आजकाल आर्थिक अनिश्चितता आहे आणि जगणे महाग झाले आहे. अनेक लोक सोशल मीडियावर इतरांचे 'चमकदार' आयुष्य पाहून स्वतःची तुलना करतात. आपल्याकडे फारच कमी पैसे आहेत, असा विचार मनात सुरू राहतो. पण खरे आर्थिक यश हे वैयक्तिक असते. डॉक्टर असो वा इंजिनिअर, प्रत्येकाने आपला खर्च, मुलांचे शिक्षण आणि वृद्धापकाळाची सोय पाहून आपले ध्येय ठरवावे. वैयक्तिक वित्त तज्ज्ञ नेहमी सांगतात की, पैशाला आरोग्य, कुटुंब आणि मोकळा वेळ याच्याशी जोडा. तरच पैसा तुमच्यासाठी तणाव नाही, तर आधार बनेल.
You earn ₹40L–₹50L a year… yet money still feels fragile.
— CA Nitin Kaushik (FCA) | LLB (@Finance_Bareek) October 30, 2025
You think, “Once I hit ₹1Cr, I’ll relax.”
But when you get there, the goal quietly doubles.
Because no one teaches us what “enough” really means — we just keep moving the target.
Truth is, enough isn’t a number.…
कोट्यधीश बनण्याचे शॉर्टकट सोडून 'हे' ३ बेसिक नियम पाळा
नितीन कौशिक यांनी आणखी एका पोस्टमध्ये लोकांना श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नका, असा सल्ला दिला आहे. त्यांनी रियल वेल्थ बनवण्यासाठी तीन मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत.
- कमाई वाढवा
 - अनावश्यक खर्च टाळा
 - उरलेले पैसे गुंतवा
 
वाचा - फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
यासोबतच, तुमची कौशल्ये सुधारणे आणि खर्चावर बारीक लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. सातत्याने घेतलेले छोटे-छोटे निर्णयच दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करतात. जटिल फॉर्म्युल्यांपेक्षा सातत्य हेच खरे संपत्तीचे रहस्य आहे.
