Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिनव्याजी कर्ज, लाईफटाईम फ्री चार्जिंग तरीही लोक टेस्ला घेईना? मस्कच्या गाड्यांकडे ग्राहकांची पाठ?

बिनव्याजी कर्ज, लाईफटाईम फ्री चार्जिंग तरीही लोक टेस्ला घेईना? मस्कच्या गाड्यांकडे ग्राहकांची पाठ?

Offer on Tesla Car : इलॉन मस्क यांची ड्रीम कार टेस्ला लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळेल. मात्र, त्यापूर्वी टेस्लाला युरोपमध्ये कार विक्रीसाठी कसरत करावी लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:39 IST2025-03-09T16:39:17+5:302025-03-09T16:39:44+5:30

Offer on Tesla Car : इलॉन मस्क यांची ड्रीम कार टेस्ला लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळेल. मात्र, त्यापूर्वी टेस्लाला युरोपमध्ये कार विक्रीसाठी कसरत करावी लागत आहे.

tesla ev car sales are dipping globally company giving attractive offers to customers | बिनव्याजी कर्ज, लाईफटाईम फ्री चार्जिंग तरीही लोक टेस्ला घेईना? मस्कच्या गाड्यांकडे ग्राहकांची पाठ?

बिनव्याजी कर्ज, लाईफटाईम फ्री चार्जिंग तरीही लोक टेस्ला घेईना? मस्कच्या गाड्यांकडे ग्राहकांची पाठ?

Offer on Tesla Car : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळेल. टेस्ला कार आपल्या अत्याधुनिक फीचर्समुळे जगभर लोकप्रिय आहेत. अनेक भारतीय ग्राहक टेस्ला कराच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, सध्या इलॉन मस्क यांचे वाईट दिवस असल्याचे दिसत आहेत. कारण, जगातील अनेक देशांमध्ये कंपनीच्या कार विक्रीत घट झाली आहे. युरोपमधील परिस्थिती तर आणखी वाईट आहे. गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी टेस्ला आता अनेक आकर्षक ऑफर्स ग्राहकांना देत आहे.

अमेरिकन नागरिक टेस्लाच्या विरोधात
इलॉन मस्क सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. कारण, मस्क यांचा सरकारमध्ये समावेश केल्यानंतर त्यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी मस्क यांनी नोकरकपातीचं फर्मान काढलं आहे. याविरोधात लोक आता टेस्ला कारच्या शोरुमबाहेर आंदोलन करत आहेत. तर बायकॉट टेस्ला म्हणून चळवळही चालवली जात आहे. अशा परिस्थितीत मस्क ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नवीन ऑफर्स देत आहेत.

टेस्ला काय ऑफर देतंय?
टेस्ला आपल्या गाड्या विकण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स देत आहे. यामध्ये शून्य टक्के व्याजदर ते आयुष्यभर मोफत चार्जिंगचा समावेश आहे. काही कारसाठी कर्जावर खूप कमी व्याजदर आहेत. टेस्लाने सायबरट्रक नावाची कार लॉन्च केली आहे. त्याची विक्री करण्यासाठी कंपनीला मोठी कसरत करावी लागत आहे. कंपनी या कारसाठी १.९९ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. हे कर्ज फक्त टेस्ला मार्फतच फायनान्स केले जाऊ शकते.

लाईफ टाईम फ्री चार्जिंग
कंपनी टेस्ला सुपरचार्जर्सला वाहनाला लाईफ टाईम फ्री चार्जिंगची सेवा देत आहे. जगभरात ६० हजाराहून अधिक सुपरचार्जर्स आहेत, जे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांना २०० मैल (सुमारे ३२२ किमी) फक्त १५ मिनिटांत चालवण्यासाठी रिचार्ज करू शकतात.

Web Title: tesla ev car sales are dipping globally company giving attractive offers to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.